नवी मुंबई: ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील महापे स्थित एका कंपनी कार्यालयास आग लागली. सदर आग विझवताना एक अग्निशमन कर्मचारी जखमी झाला. सद्य स्थितीत आगीवर नियंत्रं मिळवण्यात यश आले आहे. ठाणे बेलापूर शिळफाटा रोड येथे एमआयडीसी येथे ग्रीनस्केप टेक्नॉसिटी, महापे येथील तिसऱ्या व चौथा माळ्यावर रेक्युरन्स सिस्टिम्स प्रा. लि. या ऑफिसला सातच्या सुमारास आग लागली होती.
तिसऱ्या व चौथ्या माळ्यावर जाऊन सदर आग विझवली. सदर माळ्यावर खूप धूर असल्याने काचा फोडून धूर जाण्यास जागा केली.सदर इमारतीमध्ये कोणीही अडकले नसल्याचे प्रत्येक माळ्यावर जाऊन खात्री केली. कोपरखैरणे केंद्रातील अग्निशामक डी डी मिसाळ यांना काचा फोडताना दोन बोटांनार दुखापत झालेली आहे. त्यांना उपचारासाठी वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. बाळे अग्निशमन केंद्राचे सहायक केन्द्र अधिकारी एस एल पाटील यांनी पुढची धुरा सांभाळत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. अशी माहिती अग्निशान मुख्याधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी दिली आहे.