पामबीच मार्गालगत असलेल्या कांदळवनात मागील काही महिन्यांपासून आगीच्या घटना घडत आहेत. मात्र सदर कांदळवनात आग जाणीव पूर्वक लावत असल्याचा आरोप करत अशा प्रकारे कांदळवनाची कत्तल करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “उद्धव ठाकरेंना छोटा रिचार्ज भेटून गेला”; ठाकरे- केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका

नवी मुंबई शहराला विस्तीर्ण असा खाडी किनारा लाभला आहे. यात मोठ्या प्रमाणात कांदळवन आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून काही असामाजिक घटक या कांदळवनाच्या मुळावर उठले असल्याचे पहावयास मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून पाम बीच मार्गालगत असलेल्या कांदळवनात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कांदळवनाची मोठी हानी होत आहे. मात्र वारंवार अशा आगीच्या घटना घडत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावल्या जात आहे. त्यामुळे वनविभाग ,पोलीस व महापालिका प्रशासनाने आग लावणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.