पावणे एमआयडीसी परिसरातील केमिकल कंपनीमध्ये लागलेल्या आगीत तीन कंपन्या आगीत खाक झाल्या. रविवारी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास संगदीप केमिकल कंपनीला आग लागली होती. ही आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. मात्र जनलेवा फार्मा आणि बाबा गोडाऊनला त्या आगीचा फटका बसला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे येथील अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली. या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीच्या ज्वालांनी उच्चदाबाच्या विद्युत वाहिन्या जळून खाक झाल्याने कोपरखरणे, घणसोलीचा वीजपुरवठा रात्रभर खंडित करण्याता आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा