नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) तुर्भे आगारात ठेवण्यात आलेल्या भंगार साहित्याला बुधवारी आग लागली होती. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. भंगार साहित्याला लागलेल्या आगीत एनएमएमटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग संशयास्पद असल्याचा दावा परिवहन समितीचे माजी सदस्य समीर बागवान यांनी केला.
हेही वाचा >>> ८०० कोटी मालमत्ता करवसुलीचे लक्ष्य; महापालिकेच्या तिजोरीत ९ महिन्यांत ४६६ कोटी जमा
भंगार साहित्याला आग कशी लागते, हाच मोठा प्रश्न आहे. या तुर्भे आगारात कार्यशाळा आहे. त्यामुळे ज्वालाग्राही पदार्थाबाबत कमालीची काळजी घेणे अपेक्षित असते. त्यामुळे या प्रकारची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत असेही बागवान यांनी सांगितले. याबाबत परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांनी सांगितले की, बॅटरीला अचानक आग लागली. मात्र, ही आग फार मोठी नव्हती.