नवी मुंबई : शिरवणे एमआयडीसीतील एका इमारतीला लागलेली आग तीन तासांच्या नंतर विझवण्यात अग्निशमन दलास यश आले. सोमवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास ही आग लागली होती. या इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने कोणी राहात नव्हते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…नवी मुंबई: मुलाला आणि जावयाला नोकरीचे आमिष दाखवून १८ लाखांची फसवणूक… गुन्ह्यात बहिणीचाही समावेश 

नवी मुंबई लगत असलेल्या ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यात असणाऱ्या शिरवणे एमआयडीसी डी ब्लॉक येथे एक उतुंग टॉवर बनवण्याचे काम सुरु आहे.  सोमवारी रात्री नऊ साडे नऊच्या सुमारास विसाव्या माळ्यावर आग लागली. इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने येथे कोणीही राहत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य आगीच्या भक्ष्य स्थानी पडले. एमआयडीसीची स्वतःची अग्निशमन यंत्रणा आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास फार उशीर लागू शकत नव्हता मात्र एवढ्या उंचावर आग विझवण्यासाठी लागणारी अग्निशमन यंत्रणा त्यांच्या कडे नव्हती. त्यामुळे वाशी अग्निशमन दलाची मदत घेत ग्रांटो गाडी मागवण्यात आली होती. या गाडीच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. रात्री साडे आकाराच्या सुमारास आग पूर्णपणे विझवण्यात आली होती. मात्र एवढ्या रात्री आग कशी लागली याचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती वाशी अग्निशमन दलाने दिली.     

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fire broke out in under construction building at shiravane midc in navi mumbai psg
Show comments