नवी मुंबई : वादळी पावसात ठाणे बेलापूर एमआयडीसी मधील एका केमिकल कंपनीत आग लागली असून सुमारे अडीच तासापासून आग विझवण्याचे काम सुरू आहे सुदैवाने अद्याप तरी जीवित हानीचे वृत्त नाही

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी संध्याकाळी पावणे आठ आठ च्या सुमारास ठाणे बेलापूर एमआयडीसी पट्ट्यातील तुर्भे एमआयडीसी येथील बोन्सारी गावातील एका रासायनिक कंपनीत आग लागली सदर कंपनीत डांबर ( मिक्सिंग ऑफ फर्निश ऑइल अँड मेकिंग डांबर) उत्पादन घेतले जात होते. आगीची घटना कळताच राबाळे एमआयडीसी  अग्निशमन दल घटना स्थळी रवाना झाले मात्र आगीचा आवाका पाहता नवी मुंबई मनपा अग्निशमन दलाचे मदत घेण्यात आली सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र कुलिंगचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते यात काहीजण अडकल्याची शक्यता होती मात्र अज्ञात तसे आढळून आले नाही अशी माहिती नवी मुंबई मनपा अग्निशमन दल प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली.