उरण येथील ऐतिहासिक द्रोणागिरी डोंगराला बुधवारी सायंकाळी वणवा लागला आहे. ही आग विझविण्यासाठी स्थानिक नागरीक व शिवप्रेमी तरुणांचे दोन तासांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र हा वणवा वाढू लागल्याने व आगीच्या ठिकाणी पोहोचणे अवघड असल्याने आग वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : अंमली पदार्थ विक्री प्रकरणी पुन्हा नायझेरियन कनेक्शन; दोन अटक
उरणमधील द्रोणागिरी हा महत्त्वाचा डोंगर आहे. या डोंगराच्या पायथ्याशीच ओएनजीसीचा देशातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील डोंगरावर आग लागणे धोक्याचे आहे. त्याचप्रमाणे याच डोंगराच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे.