लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पनवेल: बारबालेसोबत केलेल्या प्रेमाचा अंत त्याने स्वतःवर गोळी मारुन केला. या घटनेतील जखमी तरुणाची प्रकृती सध्या ठिक आहे. ही घटना पनवेलमधील क्रेझी बॉईज या लेडीज सर्व्हीस बारमध्ये २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सव्वा एक वाजता घडली. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.३१) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. रुग्णालयातून पोलीस ठाण्यात अहवाल आल्यानंतर पोलीसांना याबाबत माहिती मिळाली.

पनवेल तालुक्यातील कोन गावालगत अनेक लेडीज सर्व्हीस आणि ऑर्केस्ट्रा बार आहेत. क्रेझी बॉईज हा सुद्धा त्याच बारमध्ये एक आहे. यापूर्वीही क्रेझी बॉईज या बारमध्ये अनेक प्रताप झाल्याच्या घटना घडल्या आहेत. चांगल्या गायका या बारमध्ये असल्याने पुणे, ठाणे व नवी मुंबईतून अनेक ग्राहक खास गाणे ऐकण्यासाठी व नृत्य पाहण्यासाठी या बारमध्ये येतात. या बारमध्ये खोणी येथे राहणारे निलेश घरत हा तरुण त्याच्या प्रियसीसाठी आला होता. पोलीस ठाण्यात या बारबालेने दिलेल्या तक्रारीनूसार मागील अडीच वर्षांपासून निलेश व या बारबालेचे प्रेमसंबंध आहेत.

आणखी वाचा-नवी मुंबई : महापालिकांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी

काही कारणास्तव या बारबालेने निलेशसोबत बोलणे बंद केले होते. तिने फोनवरुन संपर्क ठेवला नसल्याने निलेशने तिला गाठण्याचे ठरवले. या बारबालेने क्रेझी बॉईज या बारमध्ये निलेश २८ ऑक्टोबरला रात्री सव्वा एक वाजता भेटला. तीला का बोलत नाही असा जाब विचारला. मात्र तरीही बोलण्यास नकार दिल्याने निलेशने स्वतःसोबत आणलेल्या पिस्तुलामधून स्वतःच्या पोटात गोळी झाडली. सध्या निलेशवर उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगीतले. निलेशने स्वतःसोबत आणलेले पिस्तुल हे अवैध होते. ते विनापरवाना असल्याने तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी भादवि कलम ३३८, ३२३ प्रमाणे तसेच भारतीय हत्यार कायद कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा नोंदविला.

झालेल्या गुन्ह्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिली. यापूर्वीही क्रेझी बॉईज या बारच्या व्यवस्थापकाने परवान्याच्या अनेक अटींचे उल्लंघन केल्यामुळे पोलीस दफ्तरी या बारचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर पोलीस आयुक्त भारंबे यांनी तातडीने क्रेझी बॉईज या बारचा परवाना रद्द करण्याचे आदेश ३० ऑक्टोबरला दिले. या घनटेमुळे पनवेलमधील लेडीज सर्व्हीसबारमधील सूरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी नवी मुंबईच्या तत्कालिन पोलीस आयुक्तांनी बार संस्कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक बारच्या आत व बाहेर सीसीटिव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना. या कॅमेरांवर देखरेखीसाठी नियंत्रण कक्ष, प्रत्येक लेडीज सर्व्हीसबारच्या प्रवेशव्दारावर पोलीसांनी भेट दिल्याचे नोंदवही ठेवण्याची सूचना केली होती.

आणखी वाचा-उरणच्या खेळाडूंना मैदानाची एका तपापासून प्रतीक्षा

लेडीज सर्व्हीस बारवर अचानक धाड घालण्यासाठी वेगवेगळ्या परिमंडळातील पोलीस पथके तैनात केली होती. रात्रीच्यावेळी पुरुष पोलीस अधिकाऱ्यांसोबत महिला पोलीस अधिकऱ्यांचा या पथकात समावेश केला होता. बारबालांची वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच नोकरनामे, बारमधील टेबल आणि महिला नोकरनाम्यांची संख्या यांमधील ताळमेळ व्यवस्थित आहे का, ऑर्केस्ट्रा बारमध्ये नृत्य होऊ नये यासाठी खास पोलीस पथक नेमणे, ऑर्केस्ट्रा बारचे सभागृह आणि बारमधील गिऱ्हाईक यांचे बसण्याचे आसन यांच्यातील अंतर जास्त असण्याच्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना बारमालकांना दिल्या होत्या. मात्र क्रेझी बॉईज या बारमधील गोळीबाराच्या घटनेमुळे पनवेल व नवी मुंबईतील लेडीज सर्व्हीस व ऑर्केस्ट्रा बार रात्री साडेबारा वाजेपर्यंत नाही तर दिड वाजण्याच्या पुढे सुरु ठेवले जातात याचा पुरावा पोलीस आयुक्तांना सापडला.