नवी मुबंई : नवी मुंबई महापालिकेत ज्येष्ठ नागरीकांचा आधार ठरणारी अनेक ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र तयार करण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरीकांना आधार देणारे व त्यांची सुश्रुषा करणारे सामाजिक व खासगी संस्थांचे हजारो वृध्दाश्रम देशभरात आहेत. परंतू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून देशात व राज्यात प्रथमच नवी मुंबई महापालिका वृद्धाश्रम तयार करणारे पहिले शहर ठरले असून सीवू्डस येथील वृध्दाश्रमाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्षाच्या अखेरीस हे काम पूर्णत्वास येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नव्या वर्षात याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
नवी मुंबई पालिकेच्या मागणीनुसार सिडकोकडून पालिकेला भूखंड हस्तातंरीत झाल्यानंतर पालिकेकडून वृध्दाश्रमाच्या प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली.परंतु करोनास्थितीमुळे याच्या कामाला थोडा विलंब लागला.परंतु आता काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे पालिकेचा पहिला वृध्दाश्रम २०२२ अखेरीस पूर्ण होऊन नव्या वर्षात याची सुरवात होईल.
सद्याच्या धावपळीच्या जीवनात वृद्धांची सुश्रुषा करणाऱ्यांचे प्रमाण चांगले असून आपल्या ज्येष्ठांच्याबाबात आदर व आपुलकीने सेवा करणाऱ्यांच्या बरोबरच दुसरीकडे आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांना गैरसोयीमुळे तसेच कौटुंबिक अडचणींमुळे वृद्धाश्रमात ठेवण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे वृद्धांच्याकडून इच्छामरणाच्या मागणीमध्ये वाढ होत असताना दिसते.तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे बदलणारा काळ यामुळे वृध्दाश्रमाची आवश्यकता निर्माण झाली आहे. नवी मुंबई महापालिकेने शहरात ज्येष्ठांना आधार व विरंगुळा देणारी अनेक ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र निर्माण केली आहेत.
हेही वाचा : नवी मुंबई शहरात व्हायरल तापाची साथ ; महापालिका रुग्णालयात १६०० पेक्षा अधिक बाह्यरुग्ण
आपल्या जीवनाच्या सरत्या काळात आनंदाची,आपलेपणाची,आपुलकीची व प्रेम देणारी केंद्र अशी ओळख या पालिकेच्या विरंगुळा केंद्रांची झाली असून शहरातील लाखो ज्येष्ठांना ही केंद्र आधार वाटत आहेत.एकत्र येऊन विविध कार्यक्रम,वाचनालयाची सुविधा,करमणुकीची साधने पालिकेने या ठिकाणी दिली असताना दुसरीकडे पालिकेच्या इतिहासात प्रथमच वृध्दाश्रमाची निर्मिती करत आहे.शहरातील पालिकेचे पहिले वृद्धाश्रम सीवूड्स येथे तयार करण्यात येत आहे.मुंबई ,नवी मुंबई शहराबरोबरच पनवेल,व राज्य व देशभरात खासगी संस्थांचे वृद्धाश्रम असून नवी मुंबईत महापालिकेचे निर्माण होणारे वृद्धाश्रम हे देशभरातली व राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे पहिले वृद्धाश्रम निर्माण होत आहे. बेलापूर विभागातील नेरुळ सेक्टर ३८ येथील भूखंड क्रमांक १३ येथे हा वृध्दाश्रम निर्माण केला जात आहे .
नवी मुंबईत वृध्दाश्रम उभारण्याची मागणी पालिकेकडे केली होती.त्यानुसार शहरात पालिकेचा पहिला वृध्दाश्रम आकारास येत आहे . ज्येष्ठांसाठी हक्काची वास्तू निर्माण होत आहे. वृध्दांची वैद्यकीय तपासणी व इतर सुविधाही पुरवल्या जाणार आहेत. काही दिवसांसाठी बाहेरगावी जायचं असेल तर कुटुंबीयांना घरातील वृद्धांना या वृद्धाश्रमात ठेवण्याची सुविधाही करण्याची सूचना केली आहे. – मंदा म्हात्रे,आमदार बेलापूर
लवकरच काम पूर्ण होणार
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या वृद्धाश्रमाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील दोन महिन्यात इमारतीमधील अंतर्गत कामेही पूर्ण करण्यात येतील. -अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता बेलापूर विभाग
हेही वाचा : कदाचित “त्या”तीन कामगारांचे जीव वाचले असते ?
शहरातील पालिकेचा वृध्दाश्रम…
ठिकाण- नेरुळ सेक्टर-३८ ,भूखंड क्रमांक- १३
प्रस्तावित खर्च -४ कोटी १० लाख,५९ हजार
एकूण बांधकाम -९७६३ चौरस फुट