करंजा धक्क्यावर नांगरून ठेवण्यात आलेल्या मच्छिमार बोटीला मंगळवारी सकाळी आग लागली आहे. या आगीत संपूर्ण बोट जळून खाक झाली आहे. त्यामुळे मच्छिमार बोटीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बोटीतील स्टो ने पेट घेतल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करंजा येथील गजानन नाखवा यांच्या देवी पलसाई माता नावाच्या मच्छीमार बोटीला आग लागली आहे. याची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाला प्रचारण करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलामार्फत आग विझविण्यात आली आहे. मात्र आगीत मच्छिमार बोट जळून खाक झाली आहे. आशा प्रकारची घटना यापुर्वी ही करंजा बंदरावर घडली आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा बंदरावर उभ्या करण्यात येणाऱ्या मच्छिमार बोटींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.