बाजारात सध्या वालाच्या शेंगा येऊ लागल्या असून खवय्यांना पोपटीची चाहूल लागली आहे. त्यामुळे यावर्षीच्या हंगामातील वालाच्या शेंगांच्या पोपट्याना सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी पोपट्यांना लागू लागल्या आहेत. थंडीची सुरुवात झाल्यानंतर पोपटाची ही आस लागलेली असते. मात्र वालाच्या शेंगांना उशीर होत असल्याने पोपटाची प्रतिक्षा असते. यावर्षी डिसेंबरच्या सुरुवातीलाच बाजारात वालाच्या शेंगा आल्या आहेत. त्याची खरेदीही सुरू झाली आहे. या शेंगांना किलोमागे १०० रुपये दर आकारला जात आहे. वालाच्या पोपट्या या उरण तालुक्यातील चिरनेर तसेच इतर अनेक भागातून लावल्या जातात.

हेही वाचा >>>नवी मुंबई: वाशी कोपरी सिग्नल…बनलाय चक्का जाम सिग्नल

gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
flamingos and over 50 migratory Birds arrive at Suryachiwadi Lake
साताऱ्यातील जलाशयात ‘परदेशी पाहुणे’ दाखल; रोहित, पट्टेरी राजहंससह ५० हून अधिक स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन
Why do dogs eat grass
तुमचाही श्वान सतत गवत खातो? तो आजारी तर नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Makar sankranti Til ladoo recipe how to make tilgul at home makar sankranti 2025 recipe in marathi
मकर संक्रांत स्पेशल: संपेपर्यंत खुसखुशीत राहणारे १ किलो मऊसूत तिळाचे लाडू; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
butterfly
बालमैफल : आमच्या खिडकीतलं फुलपाखरू

वालाच्या शेंगांच्या पोपटीची लज्जत आणि चव ही सात समुद्रा पलीकडे पोहचली आहे. गवत आणि लाकडाच्या आगीवर वाफेवर शिजविलेल्या शेंगा तयार केल्या जातात. सुरुवातीला केवळ वालाच्या शेंगांच्या ऐवजी सध्या विविध प्रकारच्या शेंगा,वांगी,बटाटा, तसेच अंडी,चिकन ही या पोपटीत शिजविल्या जातात. तेला शिवाय वाफेवर शिजणाऱ्या जिन्नस चवीला उत्कृष्ट असतात.त्यामुळे पोपटी ही अनेक ठिकाणी प्रसिद्ध आहे. असे असले तरी ठराविक ठिकाणच्या पोपटीला खवय्यांकडून पसंती दिली जाते. त्यात उरण तालुक्यातील चिरनेर परिसराचा समावेश आहे.

हेही वाचा >>>उरण तालुक्यातील अंतर्गत रस्ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

या पोपटीची खरी जिन्नस म्हणजे शेतात व बांधावर मिळणारा म्हामोट्याचा पाळा ही आहे. या पाल्याचा जखमेवर लावण्यासाठी उपयोग केला जातो.
पोपटी बनविण्याची पद्धत : एका मडक्यात बुंध्याला म्हामोटा(पाळा)त्यानंतर एक थर शेंगा व इतर जिन्नस यांना मीठ मसाला लावून त्यानंतर पुन्हा म्हामोटा असे थर लावले जातात. त्यानंतर शेवटी म्हामोट्याच्या पाळ्यानी मडक्याचे तोंड बंद केले जाते. मंडक उपड करून ठेवलं जात. त्यानंतर लाकडं व गवत रचून त्याला पेटवण्यात येत. ही आग आणि त्याची धग पाऊण तास ते एक तास कायम ठेवली जाते. या वाफेचा वास आल्यानंतर मंडक काढून ते रिकाम केलं जातं.आणि वाफाळेल्या शेंगांचा आस्वाद घेतात.

Story img Loader