नवी मुंबई : मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेला दिंडी मोर्चा मुंबईत २६ जानेवारीला धडकणार असून २५ तारखेला मुंबई पूर्वी शेवटचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. यासाठी नवी मुंबई समन्वयकांनी जोरदार तयारी सुरु केली असून किमान दोन ते अडीच कोटी लोकांचा जनसागर येईल अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली २० जानेवारी पासून सुरु झालेल्या पायी मराठा आरक्षण मागणीसाठी काढण्यात आलेल्या दिंडीचा मुक्काम २५ तारखेला नवी मुंबई शहरात होणार आहे. यासाठी नियोजनच्या तयारीसाठी मराठा क्रांती मोर्चा, नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय बनवण्यात आले आहे. २५ जानेवारीला नवी मुंबई करोडोच्या संख्येने मराठा समाज नवी मुंबईत दाखल होणार आहे. त्यांच्या राहण्याची, खाण्याची तसेच पाण्याची, शौचालय व्यवस्थेबाबत नवी मुंबई मनपा आणि सिडकोला विनंती करण्यात आली आहे. या दिवशीकांदा बटाटा मार्केट बंद असणार आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतर बाजार बाबत मार्केट मधील मुक्कामाबाबत माथाडी कामगार संघटना, व्यापारी, मार्केट प्रशासनासोबत नवी मुंबई मराठा क्रांती मोर्चा शिष्टमंडळाने बैठक तसेच पत्रव्यवहार केला आहे. तसेच महिलांच्या साठी सिडको प्रदर्शनी केंद्रात सोय करावी अशी मागणी सिडको कडे करण्यात आली आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. 

हेही वाचा…उरण शहरात श्रीरामाच्या जल्लोषात भव्य शोभायात्रा

सिडको आणि नवी मुंबई मनपाने अद्याप सकरात्मक प्रतिसाद दिलेला नाही. आमचे प्रयत्न सुरु आहेत. कदाचित सरकारच्या दबावामुळे सहकार्य होत नसावे. याचा अर्थ सरकारला अद्याप मोर्चाचे गांभीर्य कळले नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. सदर पत्रकार परिषदेत समन्वयक विनोद पोखरकर, कदम सूरत बर्गे, बाळासाहेब जगताप, बन्सी डोके, साधना ढवळे आदी उपस्थित होते. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: For maratha reservation morcha preparations started at navi mumbai psg
Show comments