महापालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल शहरात सीसीटीव्ही लावले जातील अशी अपेक्षा होती, परंतू पोलीसांच्या वारंवार विनवणी नंतरही सीसीटीव्ही कॅमेरे न लावल्याने पोलीसांनी वाढत्या चो-यांवर आळा घालण्यासाठी शहरातील सराफा व्यापा-यांची बैठक घेऊन त्यांना शहरातील मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सूमारे पाच लाख रुपये जमा करत व्यापा-यांनी महिन्याभरापूर्वी शहरातील मुख्य आठ चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले.
हेही वाचा >>> नवी मुंबई : रसाळ फळांची मागणी वाढली
पनवेल शहराच्या कारभाराचे नियंत्रण पालिकेकडून महापालिकेकडे आले. या महापालिकेला पाच वर्षे उलटली तरी या शहरात वाढत्या चो-या ही पोलीसांसाठी डोकेदुखी आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर सीसीटीव्ही कँमेरांचे नियंत्रण असल्यास चोरांवर धाक राहतो, असे पोलीसांना अनेक घटनांतून उजेडात आले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या यापूर्वीच्या दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्याचा काही लाभ झाला नाही. विद्यमान वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी शहराच्या सूरक्षेसाठी पालिका सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सूचविले. यावर पालिकेच्या वतीने शहराचा विकास आराखड्याचे काम सुरु असून यामध्ये सीसीटीव्ही कँमेरांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. मात्र कँमेरे कधी बसणार याचे उत्तर पालिकेचे अधिकारी पोलीसांनी देऊ शकले नाहीत. अखेर पोलीस अधिकारी कादबाने यांनी सराफा व्यापा-यांची बैठक ८ ऑगस्ट पूर्वी घेतली. या बैठकीत पनवेल सराफ अँण्ड ज्वेलर्स असोशिएशनचे अध्यक्ष चतरलाल मेहता. उपाध्यक्ष शांतीलाल जैन, सचिव मोतीलाल जैन यांच्यासोबत इतर सराफा व्यापारी उपस्थित होते. पनवेलमध्ये सव्वाशे हून अधिक सराफा व्यापारी आहेत. प्रत्येक सराफाच्या दूकानात प्रवेशापासून व गि-हाईकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कँमेरा लावण्यात आला आहे. पोलीसांनी दूकानांप्रमाणे बाहेरील रस्त्यावर सीसीटीव्ही कँमेरा असणे गरजेचे असल्याची बाब व्यापा-यांना पटवून दिली. व्यापा-यांनी कँमेरासाठी होकार दिल्यावर २५ ऑगस्टपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्नाळा सर्कल येथील भाजीमार्केट, उरण नाका, टपालनाका, मिरची गल्ली, झवेरीबाजार, नक्षत्र चौक, जलभारत नाका याठीकाणी ३२ वेगवेगळे कँमेरे लावले. पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली व्यापा-यांनी उभारलेल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाची जबाबदारी राजेश मेहता, विशाल कोटरीया,संजय जैन, निरज कोठारी, वैभव बांठीया, बद्री जाट या व्यापा-यांच्या हाती आहे. या कँमेरांचे नियंत्रण कक्ष सध्या एका सराफाच्या दूकानात सूरु ठेवले असून काही दिवसांनी हा नियंत्रण कक्ष शहर पोलीस ठाण्यात स्थलांतरीत करणार असल्याची माहिती टेक्नो आई या कंपनीचे संचालक नईमउद्दीन शेख (रिंटू) यांनी दिली.
हेही वाचा >>>उरणमध्ये घुमणार रास दांडियाचा आवाज; नवरात्रोत्सवानिमित्त जागरणाचे आयोजन
पालिकेने पनवेल शहरभरात १७० ठिकाणे साडेतीनशे हून अधिक सीसीटीव्ही कँमेरा लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने निवडली आहेत. अजूनही सीसीटीव्ही कँमेरे कुठे असावेत यासाठी सर्वेक्षण सूरु आहेत. पालिकेचा विकास आराखडा बनविण्याचे काम सूरु असून त्यामध्ये सीसीटीव्ही कँमेरांचा प्रस्ताव अंतर्भूत करण्याचे काम सूरु आहे. सिडको वसाहतींचा कळंबोली, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, खारघर या परिसरात सिडको मंडळाने सीसीटीव्ही कँमेरे लावले आहेत.
शहरात चो-यांचे प्रमाण कमी झाले आहे. चोर रस्त्याच्या चौकात सीसीटीव्ही कँमेरा दिसल्यास तेथून जाणे टाळतात. पनवेलमधील व्यापा-यांना पोलीसांनी बैठक घेऊन आवाहन केल्यानंतर व्यापारी सराफांनी त्या आवाहनानूसार सीसीटीव्ही कँमेरा बसविले आहेत.अजूनही अनेक ठिकाणी काम सूरु आहे. पनवेलमध्ये चो-या रोखण्यासाठी पोलीसांनी व्यापा-यांच्या साह्याने केलेला हा प्रयत्न आहे. पालिका लवकरच सीसीटीव्ही कँमेरे उभारेल यासाठी आमचे प्रयत्न सूरु आहेत.- विजय कादबाने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे</strong>