लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : राज्यभरातील विविध शहरे आणि खेड्यांतून शुक्रवारी रात्री नऊ वाजल्यापासून श्री-सदस्य खारघरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली. शनिवारच्या रखरखत्या उनात आपल्या स्वारींचे जवळून थेट दर्शन मिळण्यासाठी मंडपासमोरच्या सतरंजीवर बसण्यासाठी शेकडो भक्त जागा अडवून बसले होते. यामध्ये महिला आणि लहान मुलींचे प्रमाण मोठे आहे. बंदोबस्तासाठी येणाऱ्या शहरी पोलिसांसाठी हे चित्र नवे होते. महाराष्ट्र भूषण २०२२ पुरस्कार वितरणाचा हा महासोहळा खारघर येथील कॉर्पोरेट पार्कच्या सेक्टर २९ मधील मैदानावर होत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार २० लाख श्री-सदस्यांच्या साक्षीने वितरित केला जाणार आहे.

Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

मागील आठवडाभरापासून खारघर वसाहतीमध्ये महासोहळ्याच्या तयारीसाठी ठाणे, नवी मुंबई, पनवेल महानगरपालिका आणि सिडको महामंडळ यांची यंत्रणा काम करीत आहे. परंतु या सरकारी यंत्रणांसोबत पनवेल व उरणचे श्री-सदस्य झटून कामाला लागले आहेत. शनिवारी दुपारपासून थेट सेक्टर २९ येथील महासोहळ्याकडे येणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. शनिवार सकाळपासूनच धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य रस्त्यावर रांगोळी काढण्यापासून ते सरकारी सेवकांना जेवण पुरविण्याच्या व्यवस्थेत जुंपलेले पाहायला मिळत होते. पिंपरी-चिंचवड येथून माय-लेकी शुक्रवारी रात्रीपासून स्वारींच्या दर्शनासाठी आल्या आहेत. त्या दोघीही दर्शनासाठी मंडपाच्या समोरील मोकळ्या जागेवर बसल्या होत्या.

हेही वाचा…. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला ५ हजाराहुन अधिक नागरिकांच्या भेटी

ज्येष्ठ निरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांनी बैठकींच्या माध्यमातून विचारसंस्कृती वाटपाचा उपक्रम सुरू केला. प्रत्येक गावा-खेड्यात एक बैठकीची जागा निश्चित केली. या सभागृहात दर आठवड्यातील एक दिवस श्री-भक्तांकडून दासबोधाच्या अध्यायाचे पठण केले जाते. यातून मानवतेचा आणि जीवन जगण्याचा विचार दिला जातो. यामुळे गुन्हेगारी तसेच तंटे कमी होऊन व्यसनमुक्ती आणि स्वच्छतेचा वसा श्री-सदस्यांना मिळाला. ही शिकवण देताना अनेकांनी छायाचित्रातूनच नानासाहेब आणि आप्पासाहेबांचे दर्शन घेतले.

हेही वाचा…. नेरुळमध्ये शिवाजी चौकात शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा बसविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची प्रतीक्षा

थेट भेटीची संधी श्री-सदस्यांना मिळणे हे दुर्मीळ आहे. रविवारच्या भेटीचे ठिकाण स्वारींनी ठरविल्याने खारघरच्या महासोहळ्यात लाखो श्री-सदस्य येत आहेत. श्री-सदस्यांनी महासोहळ्यात येताना नव्या सदस्यांना पुढे बसण्याची संधी द्यावी, मुखपट्टी लावून यावे, ज्या वाहनातून ते आलेत त्या वाहनचालकाचा संपर्क क्रमांक स्वत:जवळ ठेवावा, कधीही टाळ्या वाजवू नयेत, अशा सूचना बैठकांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.