नवी मुंबई : उलवे भागात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या आणि छुप्या पद्धतीने अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या आफ्रिकन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने आणि एनआरआय पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करून अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सदर आफ्रिकन नागरिकाकडून तब्बल १० लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम वजनाचे (एमडी) मेथाक्युलॉन जप्त केले आहे.
ओकांटे दा सिल्वा जॉर्ज (३६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या आफ्रिकन देशातील ज्या नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली आहे, अशा व्यक्तींच्या नावांची यादी परिमंडळ-१ च्या पोलीस उपायुक्तांनी एनआरआय पोलिसांना पाठवून दिली होती. तसेच आफ्रिकन नागरिकांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल आणि अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एस.सय्यद आणि त्यांच्या पथकांनी उलवे, सेक्टर-३ मधील श्री बालाजी अमृत सोसायटीजवळ सापळा लावला होता. या वेळी आरोपी घराबाहेर पडताच त्याला ताब्यात घेतले. तेथून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ त्याला घेराव घालून पकडले. या वेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ प्लास्टिकच्या पिशवीमध्ये १० लाख रुपये किमतीचा १०० ग्रॅम वजनाचा मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ आढळून आला.
हेही वाचा – स्वारींच्या दर्शनासाठी शुक्रवार रात्रीपासून श्री-सदस्य खारघरमध्ये दाखल
हेही वाचा – खारघर येथील कार्यक्रमासाठी एनएमएमटीची बस सेवा
पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये आफ्रिकेतील गिनी बिसाऊ देशाकडून त्याला देण्यात आलेला पासपोर्ट सापडला. सदर पासपोर्ट १४ जानेवारी २०२३ पर्यंत वैध असल्याचे आढळून आले. सदर पासपोर्टवरून ओकांटे दा सिल्वा जॉर्ज हा उलवेमध्ये मागील चार महिन्यांपासून बेकायदेशीरपणे राहत असल्याचे, तसेच तो अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात एनडीपीएस कलमासह पारपत्र अधिनियम तसेच परदेशी नागरिक कायदानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.