नवी मुंबई शहरातील कांदळवनावर दिवसेंदिवस अनधिकृत झोपड्यांचे बांधकाम, राडारोडयाचा भराव टाकून अतिक्रमण केले जाते.  याला आळा घालण्यासाठी  वनविभागाने कांदळवनात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई सह ठाणे, भिवंडी येथे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मात्र कांदळवनावरील सीसीटीव्ही यंत्रणा निविदा प्रक्रियेत अडकली असून आणखीन ७-८ महिन्यांचा अवधी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबई: कार चोरी करणारी टोळी अटक; ७० लाखांच्या १३ कार जप्त 

दिवसेंदिवस जमिनीचे दर वाढत आहेत. त्यामुळे काही असामाजिक घटकांकडून खाडीतील कांदळवनावर अतिक्रम करून त्याचा अयोग्य वापर करण्याचे सत्र सुरू असून जैवविविधता नष्ट करण्यात येत आहे. नवी मुंबई शहरातील खाडीकिनारी, कांदळवनावर अनधिकृत झोपड्या, राडारोडा भराव टाकून अतिक्रमण केले जात आहे. राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर नजर ठेवण्यासाठी नोव्हेंबर २०२२मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निंर्णय घेतला . मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात १०६  संवेदनशील ठिकाणी एकूण २७९ सीसीटीव्ही  कॅमेरे लावण्याचे नियोजन असून यासाठीची ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम व मध्य मुंबई व तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे.  त्यासाठी वन विभागाकडून कॅमेरे बसवण्याबाबत जागांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे . नवी मुंबई शहरात  १११ ठिकाणे निश्चित करण्यात आले आहे. मात्र याची अद्याप निविदा प्रक्रिया सुरू असून निविदा काढल्यानंतर वर्क ऑर्डर निघताच सीसीटीव्ही लावण्यात येतील,मात्र यासाठी आणखीन ७ ते ८ महिन्यांचा कालावधी जाईल,  अशी माहिती वनविभाग अधिकारी राजेंद्र मगदूम यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest department decided to install cctv in mangroves forest zws