उरण : नवी मुंबईतील भूमिपुत्रांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी गुरुवारी जासई येथील १९८४ च्या शेतकरी हुतात्मा दिनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१६ जानेवारी १९८४ ला राज्य सरकार आणि सिडकोच्या विरोधात माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनातील पाच शेतकरी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जासई येथील हुतात्मा स्मारकात हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

प्रथम स्मारकाच्या प्रांगणातील हुतात्म्यांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, सावित्रीबाई आंबेडकर,कर्मवीर व दि. बा. पाटील यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे दुपारी १२ वाजता पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेटच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली.

हेही वाचा >>>कोल्ड प्ले निमित्त महामुंबईत सज्जतेची आखणी; कार्यक्रमासाठी नवी मुंबईत येणारा दहा हजारहून अधिक वाहने

यावेळी नाईक म्हणाले की दि. बा. पाटील हे केवळ प्रकल्पग्रस्तांचे नव्हे तर देशाचे नेते होते. कष्टकरी वर्गाच्या हितासाठी लढण्याचा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून पक्षीय मतभेद असतांनाही सर्वांना एकत्र करून लढे दिले. भूमिपुत्रांच्या प्रश्नांविषयी नाईक म्हणाले की फेब्रुवारी महिन्यात नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या व प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव लागणार.

प्रलंबित प्रश्नांसाठी आत्मक्लेश

नवी मुंबई मधील प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून सध्या येथील घरांवर तोडक कारवाई सुरू असून ती तातडीने बंद करावी तसेच इतर प्रश्न मार्गी लावावेत अन्यथा आत्मक्लेश करील अशी भूमिका दिबाचे पुत्र अतुल पाटील यांनी मांडली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forest minister ganesh naik assurance regarding bhoomiputra in navi mumbai uran news amy