लोकसत्ता टीम

पनवेल : मावळ लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत भारतीय जनता पक्षाने निलंबीत केलेल्या पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका  लीना गरड यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सोमवारी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी मुंबई येथील सेनाभवन येथे गरड व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवबंधन बांधले. 

Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
thackeray shiv sena break in panvel
पनवेलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत फूट
Uddhav Thackeray On Mahayuti
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ९४ उमेदवार रिंगणात, अशी आहे यादी
raj Thackeray Asilata Raje
Raj Thackeray : स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात आहे राज ठाकरेंची बालमैत्रीण, म्हणाले, “आम्ही शिशूवर्गापासून…”
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
Uddhav Thackeray News Update News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना म्हणाले, “अहो देवाभाऊ, जाऊ तिथे खाऊ, मुंब्र्याच्या वेशीवर..”
nawab malik son in law sameer khan passed away
नवाब मलिक यांच्या जावयाचे निधन; काही दिवसांपूर्वी झाला होता गंभीर अपघात, निवडणूक काळात कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

लीना गरड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खारघर कॉलनी फोरमच्या माध्यमातून नागरीक, गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी यांचे संघटन बांधण्याचा प्रयत्न केला. परजिल्ह्यातून खारघरमध्ये स्थायिक होणाऱ्यांना गरड यांनी अनेकदा मदत केल्याने खारघर ग्रामपंचायत निवडणूकीत त्या पहिल्यांदा चर्चेत आल्या. लीना यांचे पती अर्जुन हे वरिष्ठ पोलीस निरिक्षक या पदावर असल्याने याच निवडणूकीत त्यांचा संपत्तीचा मुद्दा उजेडात आणून शेकापचे जयंत पाटील यांनी आरोप केले. त्यानंतर भाजपच्या चिन्हावर पनवेल महापालिकेची निवडणूक लढविलेल्या गरड या पहिल्यांदा नगरसेविका झाल्यावर त्यांना पालिकेचे महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी असताना महापौर पद न मिळाल्याने त्यांनी भाजपच्या नेत्यांकडे नाराजी व्यक्त केली. भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी खारघर फोरमच्या माध्यमातून पुन्हा जोरदार मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-नवी मुंबई: चोरट्यांकडून जप्त केलेले ५० मोबाईल मुळ मालकांना सुपुर्त, कोपरखैरणे पोलीसांची कामगिरी

पनवेल महापालिका क्षेत्रातील मालमत्ता कराच्या मुद्दयावर त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केली. तसेच या मुद्यावर त्यांनी सनदशीर मार्गाने न्यायालयात धाव घेतली. अद्याप त्या याचिकाचा निर्णय लागला नसला तरी मागील दोन वर्षात गरड या विशेष चर्चेत राहील्या. भाजपचे आ. ठाकूर यांना सध्या विधानसभा क्षेत्रात लढत देणाऱ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांपैकी लीना गरड यांचे नाव चर्चेत असल्याने भाजपच्या निलंबनानंतर त्या कोणत्या राजकीय पक्षात जातात याकडे पनवेलकरांचे लक्ष्य लागले होते. गरड व त्यांच्या सहकाऱ्यांनी १० दिवसांपूर्वी ठाकरे पितापुत्रांची भेट घेतली. अखेर सोमवारी त्यांनी शिवबंधन बांधून अधिकृत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह लोकसभा मावळ मतदारसंघाचे उमेदवार संजोग वाघिरे पाटील, जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत, गरड यांच्यासोबत त्यांचे सहकारी बांधकाम व्यावसायिक मधू पाटील, मंगेश आढाव यांच्यासह फोरमचे सदस्य उपस्थित होते.

Story img Loader