पनवेल विधान सभेचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते विवेक पाटील यांनी तुरुंगातून पत्र लिहून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. या पत्रातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे. पण विवेक पाटील यांनी याबाबत कुणाशीही चर्चा न करता थेट अशाप्रकारचा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांना पडला आहे.

खरं तर, गेली दोन वर्षे विवेक पाटील कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात आहेत. याआधी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचा आजार आता बळावला आहे. तुरुंगातून लिहलेल्या पत्रातही त्यांनी आजारपणाचंच कारण दिलं आहे. विवेक पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं समजताच शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
life sentence prisoner escapes from yerawada jail pune
येरवड्यातील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा सुनावलेला कैदी पसार
Ujjwal Nikam.
Ujjwal Nikam On EVM : “आज तुम्ही पराभूत झाल्यामुळे…” उज्ज्वल निकमांनी सांगितले ईव्हीएम विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी कोणत्या दहा गोष्टी लागणार
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Lawyer charter suspended , Police Patil, Lawyer Police Patil, Lawyer,
पोलीस पाटील पदावर काम केल्यामुळे वकिलाची सनद निलंबित
Who is Sanjay Malhotra?
Sanjay Malhotra : आरबीआयच्या गव्हर्नरपदी नियुक्त झालेले संजय मल्होत्रा कोण आहेत?

गेली अनेक वर्षे आपण विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असला तरी आम्ही त्यांची भेट घेऊ आणि त्यांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बाळाराम पाटील यांनी दिली. ते ‘आरएनओ’शी बोलत होते.

विवेक पाटील यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना बाळाराम पाटील म्हणाले, “आज सकाळीच मला विवेक पाटील यांच्या पत्राची माहिती मिळाली. त्या पत्रावरील सही निश्चितपणे विवेक पाटील यांचीच आहे. हा निर्णय घेत असताना त्यांनी शेतकरी कामगार पक्षातील सर्व सहकार्यांचं पत्राद्वारे आभार व्यक्त केले आहेत. चार वर्षापूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांना आताही प्रकृतीचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे त्यांना दर आठवड्याला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखलं केलं जातं आहे.

“आम्ही मंडळी गेल्या ३६-३७ वर्षांपासून विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यामुळे शेकापमधील अनेक कार्यकर्त्यांचे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत. आमच्या दृष्टीने हा निर्णय अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. तो निर्णय रद्द करावा, अशी विनंती आम्ही करू” असंही माजी आमदार बाळाराम पाटील म्हणाले.

Story img Loader