नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर २३ येथे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयात राष्ट्रीय तपास विभागाने पहाटे धाड टाकली होती. यातून चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- नवी मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या कार्यालयावर NIA ची धाड

चार जण ताब्यात

अतिरेकी संघटना म्हणून ओळखली जाणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर भारत सरकारने बंदी घातली आहे. असे असले तरी नेरुळ सेक्टर २३ करावेगाव या गावठाण भागात त्यांचे कार्यालय आहे. या ठिकाणी राष्ट्रीय तपास विभागाने धाड टाकल्यानंतर तब्बल ७ तासांच्या तपासणी नंतर ४ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील एक व्यक्ती याच परिसरातील रहिवासी असल्याचेही बोलले जाते.

हेही वाचा- प्रियंका रावत यांचा खून टळू शकला असता का ?

धाडीबाबत कर्मचाऱ्यांकडून मौन

कार्यालय असलेला परिसरसात दैनंदिन गरजा भागावणारी दुकाने आहेत. मात्र, सदर घटनेनंतर या कार्यालय आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी या कारवाईबाबत मौन बाळगले आहे. या ठिकाणी सहा ते सात जण कायम संगणकावर काम करीत असतात. कोणीही फारसे बोलत नाही. कामाशी काम अशा पद्धतीने काम चालते, अशी माहिती येथे येणाऱ्या एका व्यक्तीने दिली.

Story img Loader