लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उरण : बुधवारी १०.३० वाजता उरण- पनवेल मार्गावरील रेल्वे स्थानका नजीक एका चारचाकीसह,रिक्षा,आणि दोन दुचाकी आशा चार वाहनांचा एकत्रित अपघात झाला आहे. यामध्ये चार जण जखमी आहेत. या अपघातात दोन दुचाकी,क्रेटा चारचाकी वाहन व रिक्षाचे नुकसान झाले आहे. यातील रिक्षा अपघात होताच पलटी होऊन रस्त्याखाली कोसळली. अपघात नंतर जखमींना नागरिकांनी रुग्णालयात हलविले आहे. अपघात कसा झाला याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पोलीस आणि वाहतूक कर्मचारी घटनास्थळी आले.
अपघाताचा मार्ग
रेल्वे स्थानका नजीक महिनाभरापूर्वी क्रेटा वाहनाने दुचाकी वरून जाणाऱ्या एका कुटुंबाला चिरडले होते. या अपघातात एका दाम्पत्याला आपला जीव गमवावा लागला तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. या अपघाता नंतर त्या घटनेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
वेगमर्यादा हवी
हा उरण शहराला जोडणारा मुख्य मार्ग आहे. त्यामुळे कायमस्वरूपी व्यस्त असलेल्या मार्गा पैकी एक आहे. मात्र या मार्गावरील चारचाकी वाहनांसह इतर वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेण्यासाठी यंत्रणा न राबविल्यास आशा प्रकारच्या अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.