कामोठे येथील एका डॉक्टर महिलेवर गेल्या दोन वर्षांपासून अत्याचार करुन महिलेला ३७ लाख रुपयांना फसविण्याची घटना घडली आहे. या घटनेने कामोठे येथील महिलावर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.दोन वर्षांपूर्वी ओळख काढून या डॉक्टर महिलेशी संबंधित पुरुषाने मैत्री केली. त्या दरम्यान डॉक्टर महिलेचे व त्यांच्या पतीचे वाद सुरु होते. संबंधित डॉक्टर महिलेला या भामट्याने लग्नाचे आमिष दाखविले. यासाठी त्याने स्वताच्या पत्नीला घटस्फोट देत असल्याचे सांगीतले. त्यानंतर लग्नापूर्वीच त्याने पीडित डॉक्टर महिलेवर अत्याचार केले व या अत्याचाराचे व्हीडीओ तयार करून हे अश्लील व्हीडीओ समाजमाध्यमांवर पसरविण्याची धमकी देऊन पीडितेवर वारंवार अत्याचार केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : नवी मुंबई : दिवाळीपर्यंत शिक्षक भरती करा अन्यथा… पालकांचा शिक्षण विभागाला अल्टीमेटम

या दरम्यान आरोपीने १४ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि ३० लाख रुपये रोखीने काढून घेतल्याने पीडितेने कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक स्मिता जाधव याना सांगितले. पोलीस अधिकारी जाधव यांनी या गंभीर प्रकरणात स्वतः लक्ष घालून या प्रकरणी गुन्हा नोंदविला. सध्या पोलीस पथक या आरोपी पुरुषाच्या शोध घेत आहे. संबंधित पुरुष हा मूळ पेण तालुक्यातील राहणारा असून तो कामोठे वसाहतीमधील सेक्टर २२ येथील इमारतीमध्ये राहायला होता.