नवी मुंबई: सट्टा बाजार अर्थात शेअर मार्केट हे गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मात्र त्याचा अभ्यास आवश्यक असल्याचे नियमित गुंतवणूक सांगतात. मात्र असाच अभ्यास करून आम्ही टिप्स देतो, शिवाय शेअर मार्केट मध्ये कशी गुंतवणूक करायचे हे शिकवतो सांगत एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख ६४ हजार ५४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

संदीप खुराणा असे यातील फिर्यादीचे नाव असून ते एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत भागीदार आहेत. त्यांना ६ ऑगस्टला फोन आला आयसीआयसीआय बँकेतून  मुमताज मिमो बोलते असे समोरील व्यक्तीने सांगितले व शेअर मार्केट मध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी टिप्स देणे, मार्गदर्शन करणे आदी माहिती हे काम करत असल्याचे सांगितले. संदीप यांनी यापूर्वी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केलेली असल्याने त्यांनाही ही संधी वाटली व त्यांनी होकार दिला.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
disha patani father Jagdish Singh patani
अभिनेत्री दिशा पटानीच्या वडिलांची फसवणूक; बढती देण्याचं आमिष दाखवत २५ लाख लुबाडले
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार

हेही वाचा… सागरी व खाडी प्रदुषणामुळे छोट्या पारंपारिक मच्छिमारांचा व्यवसाय घटला; ताज्या मासळीचा तुटवडा जाणवू लागल्याने कुटुंबावर उपासमार

काही वेळातच त्यांना  Stock Market Investor Alliance VIP 7 या व्हॉट्सअ‍ॅप समूहात घेण्यात आले ज्याचे  ऍडमिन एलिझा नावाचे व्यक्ती होते. इथून पुढे थोडी थोडी गुंतवणूक कशी करावी याचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु झाले. त्यानंतर लिंक पाठवणे , पैसे भरण्यास सांगणे सुरु झाले. यात संदीप यांच्या समवेत एकूण चार व्यक्तींशी ऑनलाईन आणि मोबाईलवर संपर्क आला. ६ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबर दरम्यान संदीप यांच्या कडून एकूण चाळीस वेळा एक लाख ते १४ लाख अशा रकमा घेतल्या. असे एकूण १ कोटी २३ लाख ६४ हजार ५४ रुपये भरले.

हेही वाचा… पनवेल: नववीच्या वर्गात काढलेल्या एका लज्जास्पद छायाचित्रामुळे विद्यार्थीनीने जिवनयात्रा संपविली

मात्र दर वेळी विविध कर भरा, मोठी रक्कम असल्याने थोडे थांबा, अशी चालढकल अनेक दिवस केली गेली. आपली  फसवणूक होत असल्याच्या संशयाने संदीप यांनी गुंतवणूक केली ती रक्कम परत करा असा तगादा सुरु केला. त्यामुळे समोरील व्यक्तीने संपर्कच तोंडाला. शेवटी संदीप यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी त्या चार अनोळखी लोकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.