मालमत्ता खरेदी तांत्रिक माहिती सर्वसामान्य नागरिकांना माहिती नसल्याने अनेकदा फसवणूक होते. मात्र नवी मुंबईत बांधकाम क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या व्यक्तीचीच फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून कार्यालयास जागा घेतली.  त्यापोटी एक कोटी रुपये जागा मालकाला दिले. मात्र, तीन वर्ष उलटूनही व्यवहार पुढे सरकला नाही. त्यामुळे शेवटी याबाबत पोलिसांच्याकडे धाव घेत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- नवी मुंबई शहरातील “स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला” लवकरच “बांगर” बुस्टर

नवी मुंबई हे देशातीत वेगाने विकसित होणारे शहर असल्याने जागांचे, कार्यालयाचे, सदनिकांचे रोजच मोठ्या प्रमाणात व्यवहार होत असतात. गेल्या काही वर्षात फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असून व्हाईट कॉलर क्राईम म्हणून ही गुन्हे पद्धत ओळखली जाते. मात्र बहुतांश वेळा बांधकाम व्यवसायिक आरोपीच्या पिंजऱ्यात असतात. मात्र, सीबीडीमध्ये असा एक प्रकार समोर आला आहे. ज्यात बांधकाम व्यावसायिकाचीच फसवणूक झाली आहे.

हेही वाचा- २१ वर्षांपासून सुरू असलेल्या धर्मवीर क्रिकेट स्पर्धांचा रंगणार थरार; संजय राऊत यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार

सीबीडी येथे असणाऱ्या माय सिटी कन्स्ट्रक्शनचे विक्रांत मग्गु आणि त्यांचे सहकारी लोकेश मेहता, संजीव गुप्ता आणि जयदीप पाथरीया यांनी मिळून सेक्टर १५ येथील थापर कॉम्प्लेक्स मधील ५०३/५०४/५०५ हे कार्यालय विकत घेतले. याचे एकूण क्षेत्रफळ १ हजार २८३ चौरस फुट आहे. हे कार्यालय एकूण एक कोटी १५ लाखांना  रिटा थापर आणि  पोरस थापर यांच्याकडून घेतले. ऑगस्ट २०१९ मध्ये या व्यवहारापोटी १ कोटी १५ लाख पैकी १ कोटी रुपये धनादेशाद्वारे अदा करण्यात आला होता. तसेच  इमारतीतील ५०३/५०४/५०५ हे वेगवेगळे असल्याने त्याची एकत्रित नोंदणी करणे तसेच  विकासक आणि ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करणे थापर यांची जवाबदारी आहे जी टाळली जात आहे. त्यामुळे सदर व्यवहार अद्याप पूर्ण केला गेला नाही. तसेच पैसेही परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आपली फसवणूक होत असल्याची खात्री झाल्यावर याबाबत विक्रांत यांनी सीबीडी पोलीस ठाण्यात रिटा थापर आणि  पोरस थापर यांच्या विरोधात  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 