नवी मुंबई : समाजमाध्यमाद्वारे पैसे कमवण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे ४२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. संबंधित महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर वाशी पोलीस ठाण्यात फसवणूक करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाइन टास्क पूर्ण करा, भरपूर पैसे कमवा असे आमिष दाखवून एका महिलेची ४१ लाख ९२ हजार ५८२ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादी महिला वाशीत राहत असून रोखपाल म्हणून काम करतात. २ जूनला त्यांना रँक माय अॅप कंपनीकडून प्रतीक्षा नावाच्या महिलेचा फोन आला. त्यांनी टेलिग्राम या समाज माध्यमातील टास्क पूर्ण केल्यास एका फेरीसाठी ८०० ते १००० रुपये मिळतील असे आमिष दाखवले.

pimpri chinchwad cyber crime loksatta news
सायबर क्राइम : महिन्याला दहा टक्के परतावा? उच्चशिक्षित तरुणाची ८० लाखांची अशी झाली फसवणूक…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
fraud with aqua marine global culture company
एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीची फसवणूक
investment management in guidance on iccha pattra in parle
पार्ल्यात उद्या गुंतवणूक व्यवस्थापन, ‘इच्छापत्रा’वर मार्गदर्शन; सायबर फसवणुकीच्या सापळ्यांपासून बचावाचे उपाय
share market fraud loksatta news
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४४ लाखांची फसवणूक
mumbai torres jewellers loksatta news
टोरेस फसवणूकप्रकरणी पोलीस ठाण्यासमोर गर्दी, ठेवीच्या परतफेडीसंदर्भात हजारो गुंतवणूकदारांचे अर्ज
torres scam in mumbai
Video: “आठवड्याला ११ टक्के व्याज मिळणार होतं, पण…”, ‘टोरेस’नं ग्राहकांना फसवलं, पैसे गुंतवून पश्चात्ताप झाल्यानं नागरिक हवालदिल!
Cyber Fraud Accused Arrested
Cyber Fraud: अमेरिकेतील मॉडेल असल्याचे भासवून ७०० महिलांची डेटिंग ॲपवरून फसवणूक; दिवसा नोकरी, रात्री भुरटेगिरी, असा पकडला आरोपी

हेही वाचा >>>फ्लेमिंगोंच्या अधिवासात रस्ता नको, राज्य सरकारच्या पाहणी पथकाच्या अहवालात खाडीकिनारचा रस्ता बंद करण्याची शिफारस

सहज बसल्या बसल्या हे काम होते. म्हणून फिर्यादी महिलेने काम करण्याची तयारी दाखवली. मात्र आगाऊ रक्कम, देयक देण्यापूर्वी विविध कर, हे काम करण्यासाठी नोंदणी शुल्क आदी कारणे पुढे करीत फिर्यादी यांच्याकडून २ जून ते ३ नोव्हेंबरदरम्यान ४२ लाख ८१ हजार ३४६ रुपये विविध खात्यांत मागवून घेतले.

अनेकदा मागणी केल्यावर त्यापैकी ८८ हजार ७६४ रुपये परत करण्यात आले. मात्र उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत राहिले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी महिलेने या व्यवहारात त्यांच्याशी संपर्क साधणाऱ्या चार जणांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत वाशी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader