नवी मुंबई : समाज मध्यातून आलेल्या जाहिरातीला भुलून एका व्यक्तीने ट्रेडिंग मध्ये ५ लाख ४१ हजार ८०० रुपयांची गुंतवणूक केली मात्र त्याला त्याचे ना पैसे मिळाले ना परतावा मिळाला. याबाबत सदर व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून कोपरखैराणे पोलिसांनी संबंधित व्यक्ती विरोधात सायबर गुन्हा कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

कोपरखैरणे येथे राहणारे फिर्यादींना समजा माध्यमात एक जाहिरात पाहण्यात आली त्यानुसार ऑन लाईन रेटिंगचे काम असून त्याद्वारे ट्रेडिंग करत चांगला पैसा कमावता येतो असे आमिष दाखवले. त्यामुळे फिर्यादी यांनी समाज माध्यमात आलेल्या या जाहिरातीतील फोनवर संपर्क करून काम करण्यात उत्सुक असल्याचे सांगितले. त्यामुळे केवळ ऑन लाईनच संपर्क करणाऱ्या आरोपीने फिर्यादी यांना विविध खाते क्रमांक देत त्यात पैसे भरण्यास सांगितले. सुरवातीला एकदा परतावा चांगला दिल्याने फिर्यादी यांचा विश्वास आरोपीने संपादित केला. त्यानंतर मात्र थोडे थोडे करीत १८ एप्रिल ते २४ एप्रिल दरम्यान तब्बल ५ लाख ४१ हजार ८०० रुपये आरोपीने सांगितलेल्या विविध खात्यात भरले मात्र परतावा मिळालाच नाही शिवाय रेटिंग मधून मिळणारे पैसेही मिळाले नाहीत त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी याबाबत कोपरखैरणे  पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीची शहानिशा करीत संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक लिंकन हसुरे हे तपास  करीत आहेत. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fraud of rs 5 lakh 41 thousand 800 by pretending to do rating work amy
First published on: 12-06-2024 at 14:23 IST