उलवा नोडमध्ये हेवी डिपॉजिटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दुकलीचा शोध पोलीस घेत आहेत. आतापर्यंत त्यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल झाले असून ही संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने घर घेताना पुरेशी कायदेशीर सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा- नवी मुंबई शहरात सर्वाधिक वर्दळ असलेल्या सीवूड्स वाहतूक शाखेकडे टोईंग वाहनच नाही
नवी मुंबईतील उलवा नोड हा वेगात विस्तारणारा नोड ठरत आहे. नोड नव्याने वसत असल्याने घरांची उपलब्धता जास्त आहे. त्यामुळे भाडे नवी मुंबईच्या तुलनेत कमी आणि उत्तम कनेक्टीव्हीटी असल्याने तिकडे राहण्याचा कल वाढत आहे. याचा गैरफायदा घेत घर भाड्याने देणाऱ्या एजन्सीचे फावत आहे त्यात फसवणुकीच्या घटनेत वाढ होत आहे. याच ठिकाणी हेवी डीपाँजिट देत घर घेणाऱ्यांची संख्येत वाढ होत आहे. ऐरोलीत राहणारे अब्दुलसमद शेख यांना उलवा येथे हेवी डीपाँजिट मध्ये सदनिका हवी होती. त्या शोधात त्यांचा परिचय राजन तिवारी आणि अंकित वधवाना यांच्याशी झाला. दोघांनीही त्यांना हेवी डीपाँजिट मध्ये घर देण्याचे आमिष दाखवले. त्यांनी मोरेश्वर अपार्टमेंट मधील सदनिका क्रमांक १०३ सेक्टर ५ हि दाखवली. सदर सदनिका पसंत पडल्याने त्यांनी ५० हजार आगाऊ रक्कम दिली व नंतर साडेचार लाख रुपये आर.टी.जी.एस द्वारा दिले. मात्र सदनिका मालक चंदन सिंग यांच्या समवेत हेवी डीपाँजिट ऐवजी भाडे करार केला. याबाबत दोन्ही दलालांनी तुमच्या ताब्यात सदनिका आहे ना काळजी करू नका अशी बोळवण केली. करार पत्रात हेवी डीपाँजिटचे पैसे कियान इंटरप्राईजेस मध्ये गुंतवले असून दरमहा भाडे त्यातून दिले जाईल अशा विश्वास दिला.
हेही वाचा- सिडकोचे कोटींचे भूखंड बेकायदा रोपवाटिका चालकांना आंदण, पालिका व सिडकोचे दुर्लक्ष
२० फेब्रुवारीपासून करार पत्र अंमलात आले. सुरवातीला ५ ते ६ महिने व्यवस्थित भाडे मालकाला देण्यात आले. मात्र नंतर भाडे देणे बंद केले गेले. याबाबत सुरवातीला दोन्ही दलालांनी बोलण्यास टाळाटाळ केली आणि नंतर फोन उचलणे बंद केले आणि काही दिवसापूर्वी कार्यालयास टाळे ठोकून बेपत्ता झाले. चौकशीत याच इमारतीत राहणाऱ्या राणी भोजगतर यांच्या कडून हि हेवी डीपाँजिट म्हणून ८ लाख रुपये घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने राजन तिवारी आणि अंकित वधवाना यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा एनआरआय पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- नवी मुंबई : कोकण विभाग मतदार संघाच्या नवीन मतदार यादीत ३७ हजार ७१९ मतदार
अब्दुल हे जेव्हा जेव्हा राजन तिवारी आणि अंकित वधवाना यांच्या कार्यालयात जात होते तेव्हा अशाच पद्धतीने फसवणूक केलेले किमान १० ते १२ जण त्यांना भेटले त्यामुळे हि फसवणूक केवळ दोघांची नाही तर अनेकांची झाल्याचे निदर्शनास आले. मात्र इतरांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. अशीही माहिती समोर आली.
हेवी डीपाँजिट : घर भाड्याने घेताना अनामत रक्कम आणि नियमित घरभाडे ठरवले जाते. मात्र हेवी डीपाँजिट मध्ये एक मोठी रक्कम घर मालकाला ठरविलेल्या कालावधी साठी दिली जाते हा कालावधी संपल्यावर हि पूर्ण रक्कम भाडे करूस दिली जाते.