पनवेल : मुंबई आणि नवी मुंबईतील नागरिकांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एक्वा मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात अंधेरीतील गुंतवणूकदार मोहम्मद इस्माईल शेख यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कंपनीने महिन्याला १५ टक्के परताव्याचे आश्वासन देत शेख यांच्याकडून १४ लाख रुपयांची गुंतवणूक घेतली होती. सुरुवातीचे काही महिने परतावा दिल्यानंतर कंपनीने तो थांबवला. तक्रार दाखल झाल्यानंतर खारघर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास अंधेरी एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केला. मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांनी कंपनीचे मालक विनय कांबळे यांना ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले.

Story img Loader