पनवेल :साडेतीन वर्षाच्या बालकावर यशस्वीरित्या कर्ण रोपणाची शस्त्रक्रिया कामोठे येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयात (एमजीएम) गुरुवारी झाली. रायगड जिल्हा व नवी मुंबईतील ही पहिलीच शस्त्रक्रीया आहे. अवघ्या १५ दिवसात या शस्त्रक्रीयेसाठी दोन वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आणि एमजीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय मदतीमुळे ही शस्त्रक्रीया करु शकलो, असे मत नाक, घसा व कानाचे डॉक्टर मनीष जुवेकर यांनी व्यक्त केले. शस्त्रक्रीया यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी दुपारी एमजीएम रुग्णालयाचे संचालक डॉ. सूधीर कदम यांनी डॉ. मनीष व त्यांच्यासोबत सोबत काम करणा-या सर्वांचे कौतुक केले. या शस्त्रक्रीयेमुळे एका बालकाला सामान्य बालकांप्रमाणे जगता येणार आहे.   

हेही वाचा >>> देवीचे चित्र असलेल्या नाण्याच्या नावाखाली वयोवृद्धाची लाखोंची फसवणूक

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Health Department provided assistance to 2 5 lakh critically ill patients mumbai news
आरोग्य विभागाने अडीच लाख दुर्धर आजाराच्या रुग्णांना दिला मदतीचा हात! पॅलिएटीव्ह सेवेचा करणार विस्तार…
chief officer of mhada nashik board suspended
म्हाडाच्या नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी निलंबित; २० टक्के योजनेतील घरे मिळविण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

जन्मापासून मूकबधीर असलेल्या या मुलाच्या कर्णरोपणाच्या शस्त्रक्रीया करीता त्याचे पालक विविध ठिकाणी वैद्यकीय मदतीसाठी पाठपुरावा करत होते. एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुलदीप सलगोत्रा, डॉ. कल्पना राजीवकुमार, डॉ. राहुल, प्रोफेसर स्वप्नील गोसावी, भूलतज्ज्ञ डॉ. जशी साबू, डॉ. अनिंदा, डॉ. सूरभी यांनी ही शस्त्रक्रीया यशस्वी करण्यासाठी योगदान दिल्याचे डॉ. मनीष म्हणाले. मूकबधीरतेची समस्या समजल्यावर पालकांनी बालकांचे वय अठरा महीने ते साडेतीन वर्षे होईपर्यंत ही शस्त्रक्रीया केल्यास बालकांना सामान्य मुलांप्रमाणे जगता येऊ शकेल. मुंबईतील मोजक्या रुग्णालयात ही शस्त्रक्रीया विनामुल्य होते. राधामोहन मेहरोत्रा संस्था व वटूमल संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ६ लाख ३० हजार कर्णरोपणाचे यंत्र अवघ्या १५ दिवसात सर्व कागदोपत्री व्यवहार पुर्ण करुन बालकाला मिळाले तसेच एमजीएम रुग्णालयाने वैद्यकीय खर्च उचलला त्यामुळे १० लाख रुपयांची ही शस्त्रक्रीया होऊ शकली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेत या शस्त्रक्रीयेसाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. डॉ. मनीष यांनी एमजीएम रुग्णालयातच त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुर्ण केले असून त्यांच्या शिक्षणादरम्यान डॉ. मनीष हे अभ्यासू व महत्वकांक्षी असल्याने आतापर्यंत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात स्वताचे व एमजीएम रुग्णालयाचे नाव उंचावल्याचे मत एमजीएमचे संचालक डॉ. कदम यांनी व्यक्त केले. 

हेही वाचा >>> Yashashree Shinde Murder Case : “यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू, एकावर दाऊदचं नाव, दुसऱ्या..” पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

कानापासून मेंदूपर्यंत आवाज जात नाही. त्यामुळे या मुलांनी कधीच आवाज एेकलेला नसतो. त्यामुळे ते बोलूही शकत नाहीत. बाल्यावस्थेमध्ये त्यांच्यावर उपचार न केल्यास हे बालक मूकबधीर राहतात. साडेतीन वर्षापर्यंतच अशा बालकांवर उपचार होऊ शकतात. त्यामुळे यशस्वी शस्त्रक्रीयेमुळे आज एका बालकाला साधारण मुलांप्रमाणे आयुष्य जगता येईल याविषयी समाधान वाटत आहे.- डॉ. मनीष जुवेकर,

Story img Loader