पनवेल :साडेतीन वर्षाच्या बालकावर यशस्वीरित्या कर्ण रोपणाची शस्त्रक्रिया कामोठे येथील महात्मा गांधी मीशन रुग्णालयात (एमजीएम) गुरुवारी झाली. रायगड जिल्हा व नवी मुंबईतील ही पहिलीच शस्त्रक्रीया आहे. अवघ्या १५ दिवसात या शस्त्रक्रीयेसाठी दोन वेगवेगळ्या धर्मादाय संस्थांनी दिलेल्या आर्थिक मदतीमुळे आणि एमजीएम रुग्णालयाच्या वैद्यकीय मदतीमुळे ही शस्त्रक्रीया करु शकलो, असे मत नाक, घसा व कानाचे डॉक्टर मनीष जुवेकर यांनी व्यक्त केले. शस्त्रक्रीया यशस्वी झाल्यानंतर गुरुवारी दुपारी एमजीएम रुग्णालयाचे संचालक डॉ. सूधीर कदम यांनी डॉ. मनीष व त्यांच्यासोबत सोबत काम करणा-या सर्वांचे कौतुक केले. या शस्त्रक्रीयेमुळे एका बालकाला सामान्य बालकांप्रमाणे जगता येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in