खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष करोना कक्ष उभारण्याचे आदेश

नवी मुंबई : शहरातील खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात विशेष करोना कक्ष उभारण्याचे आदेश नवी मुंबई पालिका प्रशासनाने यापूर्वीच दिले असून वाशी सेक्टर तीन येथील एका बडय़ा रुग्णालयाने अद्याप

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
loksatta kutuhal artificial intelligence in decision making
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्णयांची अंमलबजावणी
Heavy police presence on the occasion of Prime Minister narendra modis visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त

करोना कक्ष सुरू न केल्याने त्यांनाही हा कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाने आपल्याकडील एक हजार १०० रुग्णशय्या सर्वसाधारण रुग्णांसाठी खुल्या ठेवल्या असून १०० रुग्णशय्या या केवळ करोनाबाधित पोलिसांच्या मोफत उपचारांसाठी राखीव ठेवल्या आहेत.

नवी मुंबईत करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे. एपीएमसी बाजारामुळे या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे पालिकेने नवी मुंबईत ठिकठिकाणी करोना रुग्णांवर उपचार होतील अशी वैद्यकीय यंत्रणा उभारण्यावर भर दिला जात आहे.

शहरातील फोर्टिज, हिरानंदानी, रिलायन्स, तेरणा, अपोलो यासारख्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयांनी यापूर्वीच करोना रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू केले असून या रुग्णालयांचे भरमसाट शुल्क भरू शकणारे अनेक रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत. वाशी व बेलापूर येथे गेली तीस वर्षे वैद्यकीय शिक्षण तसेच खासगी रुग्णालय चालविणाऱ्या एका बडय़ा रुग्णालयाने अद्याप सानपाडा येथील आपल्या नियोजित रुग्णालयाची इमारत या करोनासाठी देण्यास तयारी दर्शवलेली नाही. नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयाने आपल्याकडील एक हजार २०० रुग्णशय्या या केवळ सर्वसाधारण रुग्णांसाठी राखून ठेवल्या आहेत. यात कोविड १९ रुग्णांसाठी १०० रुग्णशय्याचा विशेष कक्ष सुरू करण्यात आला असून २१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. नवी मुंबई पालिकेने वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय हे संर्पूण केवळ करोना रुग्णांसाठी तयार केल्याने तेथील सुमारे ३०० सर्वसाधारण रुग्णांना नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. स्थलांतरित रुग्णांवर पालिका खर्चातच त्या ठिकाणी उपचार केले जात आहे.

या संकट काळात कायदा व सुव्यवस्थेबरोबरच करोना रुग्णांना रुग्णालयात ने आण करणाऱ्या करोना योद्धा पोलिसांसाठी डी. वाय. पाटील रुग्णालयात १०० मोफत रुग्णशय्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.