नवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे घणसोली या दोन्ही नोडमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. एक तर जूनचा तिसरा आठवडा सुरू आहे आणि तरीही पावसाने दडी मारल्याने वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत आहे, त्यात अशा पद्धतीने वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर व्यवसायावरही परिणाम होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

विशेष म्हणजे, मान्सूनपूर्व कामांसाठी तासंतास वीजपुरवठा खंडित करून सर्व कामे केल्याचे सांगत महावितरण स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. मात्र मान्सूनपूर्व कामे होऊनही वीजपुरवठा अद्याप सुरळीत नाही. रोज किमान चार ते पाच वेळेस वीजपुरवठा खंडित होतो, अशी माहिती कोपरखैरणे सेक्टर १९ येथे राहणाऱ्या वासुदेव आगासकर या ज्येष्ठ नागरिकाने दिली. तर आमचा दुग्ध व्यवसाय असून वारंवार विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्याचा परिणाम दुग्धजन्य पदार्थांवर होतो. परिणामी अनेकदा फेकून द्यावे लागतात, अशी माहिती सेक्टर १५ येथील कमल डेअरी चालकाने दिली.

हेही वाचा – नवी मुंबई: शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधींच्या सेवेसाठी ‘ओएसडी’

जूनचा तिसरा आठवडा सुरू आहे मात्र अद्याप पाऊस सुरु न झाल्याने वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत असून याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होत आहे. काल रात्री साडेअकरा वाजता कोपरखैरणेतील बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला तर सुमारे दिड तासांनी वीजपुरवठा सुरू झाला. आता पुन्हा सकाळी साडेदहाला वीजपुरवठा कोपरखैरणे येथे खंडित झाला आहे. अशीच अवस्था घणसोली खासकरून गावठाण भागातील आहे.

हेही वाचा – नवी मुंबई : महापालिकेच्या कोपरखैरणेतील सीबीएसई शाळेसमोर विद्यार्थी व पालकांचे शिक्षक वाढीसाठी आंदोलन

याबाबत मुख्य कार्यकारी अभियंता एस. डी. गायकवाड यांना विचारणा केली असता बुधवारी रात्री ट्रान्सफॉर्मरची समस्या होती, मात्र सकाळपासून वीजपुरवठा का खंडित झाला याबाबत माहिती घेत लवकरात लवकर सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात येईल, अशी माहिती दिली.