नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वधारले होते, ते आता आवाक्यात येत असून मात्र बाजारात सध्या आल्याचे बाजारभाव चढेच आहेत. जुन्या आल्याला अधिक मागणी असून आवक कमी असल्याने दर कडाडले आहेत. घाऊकमध्ये अवघे २० टक्के जुने आले दाखल होत असून उर्वरित नवीन आले आवक होत आहे. त्यामुळे घाऊकमध्ये जुने आले प्रतिकिलो २१०-२२० रुपये तर नवीन आले ७०-७५ रुपयांनी विक्री होत आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून या थंडगार वातावरणात नागरिक आले घातलेला गरमागरम फक्कड चहा पिण्यास पसंती देत असतात. गृहिणींकडूनही प्रत्येक भाजीमध्ये आल्याला पसंती दिली जाते. त्यामुळे बाजारात गेल्यावर गृहिणी हमखास आले घेण्यास आखडता हात घेत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तसेच बहुगुणी आले औषधीसाठीही वापरात असते, त्यामुळे वर्षाच्या ३६५ दिवस अद्रकला मागणी असते. मागील तीन महिन्यांपासून आल्याची आवक घटली असल्याने दर वाढले आहेत, अशी माहिती व्यापारी संतोष नवले यांनी दिली आहे. यंदा पुरेसा पाऊस पडत नसल्याने उत्पादन कमी झाले असून परिणामी आवक घटली आहे. शनिवारी घाऊक बाजारात ६ गाड्या दाखल झाल्या असून केवळ ६९७ क्विंटल आवक झाली आहे. यामध्येही जुन्या आल्याला अधिक मागणी असल्याने त्याचे दर चढेच आहेत.

हेही वाचा : उरण : रानसई धरणाची संरक्षण भिंत सुरक्षित, एमआयडीसीचा दावा

बाजारात ८० टक्के नवीन आले तर अवघे २० टक्के जुने आले दाखल होत आहे, त्यामुळे जुन्याला अधिक मागणी असून दर वधारलेलेच आहेत. घाऊक बाजारात नवीन आले प्रतिकिलो ७०-७५ रुपये तर जुने आले २१०-२२० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे.