पनवेल : हेदुटणे गावात राहणा-या एका १३ वर्षीय बालिकेला समाजमाध्यमांवरील मैत्रीमुळे मनस्ताप, बदनामी आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागले आहे. या घटनेची रितसर तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेदुटणे गावातील शाळेत जाणा-या एका बालिकेला या सर्व मानसिक छळाच्या घटनेला तोंड द्यावे लागले आहे. मागील सात महिन्यांपासून पिडीत बालिकेची आणि संशयीत आरोपी समाजमाध्यमांवर एकामेकांना ओळखू लागले. या दरम्यान समाजमाध्यमांवर त्यांचे बोलणे सूरु होते. ओळखीनंतर दोघा़त मैत्री झाली. बालिका अल्पवयीन असल्याचे माहित असूनही बालिकेला नग्न छायाचित्र पाठविण्यास संशयीत आरोपीने प्रवृत्त केले. त्यानंतर पिडीतेने पाठविलेले छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन संबंधित पिडीता राहत असलेल्या सोसायटीच्या आवारात येऊन हात हातात घेऊन आरोपीने छायाचित्रे काढले.

हेही वाचा… इंटरनेट सेवा खंडित झाल्याने उरणचे सेतू केंद्र बंद, विद्यार्थ्यांची शालेय दाखल्यासाठी धावपळ

हेही वाचा… नवी मुंबई: अनधिकृत फलकापासून शीव पनवेल मार्ग मुक्त 

काही दिवसांनी आरोपीने पिडीतेच्या भावाला पीडीतीने पाठविलेले नग्न छायाचित्र पाठवून त्यांच्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी केली. एवढ्यावरही आरोपी थांबला नाही त्याने पिडीतेचे बनावट इन्स्टाग्राम खाते उघडून त्या खात्याला पिडीतेचे अश्लिल नाव देऊन तीला बदनाम केले. सध्या या प्रकरणातील आरोपी फरार आहे. पोलीस उपनिरिक्षक अंबिका अंधारे या घटनेतील आरोपीचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील यांनी या प्रकरणी विनयभंग, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हे नोंदविले आहेत.