लेडीज सर्व्हीस बारमध्ये गिर्हाईकांना आकर्षित करण्यासाठी गायिका , नर्तकी आणि महिला वेटर यांच्याकडून अनेक वेगवेगळे चाळे सूरु असतात. गि-हाईक एकदा या बारबालेंच्या नजरेच्या जाळात अडकला की तो मोठ्या प्रमाणात या बारबालांवर पैसे उधळतो. मात्र याच पैसे उडविण्यावरुन तालुक्यातील मुन लाईट या लेडीज सर्व्हीस बिअरबारमध्ये मंगळवारी रात्री बारबालांच्या मेकअप खोलीत धुमश्चक्री घडली. ही मारहाण एवढी भयानक झाली की एका बारबालेला इतर तीन बारबालांविरोधात पोलीसात जावे लागले. अखेर पोलीसांनीही या घडलेल्या प्रकाराबाबत थेट गुन्हा नोंदविला.

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुनलाईट या लेडीज सर्व्हीस बारमध्ये एका गि-हाईक पैशांची उधळण करत होता. मात्र काही वेळाने त्याने पैसे वाटण्याचे अचानक थांबवले. मनीषा शेट्टी (नाव बदललेले आहे) ही त्यावेळी गायनाच्या मजल्यावरुन मुनलाईट हॉटेलमध्ये गात होती. मनीषा हीचे गायन संपले आणि ती मेकअप खोलीत आरामासाठी गेली. यावेळी या खोलीत असणा-या रुक्साना, सोनम आणि आरोही (पुर्ण नाव माहित नाही) या तीनही महिला वेटरने मिळून मनीषा बेदम मारहाण केली.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
stray puppies burnt alive
तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या कुत्र्याच्या ५ पिलांवर पेट्रोल टाकून जाळलं; झोप मोड होते म्हणून २ महिलांचं क्रूर कृत्य
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

हेही वाचा: नवी मुंबई : पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंग यांची बदली, मिलिंद भारंबे नवे पोलीस आयुक्त

या मारहाणीचे कारण गि-हाईक पैसे देण्यास तयार असताना मनीषाने पैसे न देण्याचा सल्ला का दिला होता. याचाच राग आल्याने मनीषाचा चेहरा या तीघींनी हाताच्या नखांनी ओरबडला तसेच रुक्साना हीने मनीषाच्या बोटाला चावा घेतला. या झटापटीत मनीषाची सोनसाखळी तुटली. या सर्व घडलेल्या प्रकाराची रितसर तक्रार रात्री साडेतीन वाजता पनवेल शहर पोलीस ठाण्यात जखमी मनीषाने दिली आहे.