करोनामुळे गणेशोत्सवाच्या ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला एक महिना विलंब

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप व इतर परवानगीकरिता ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून दिलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून महापालिका ही प्रणाली राबवत आहे. महापालिका येत्या २५ जुलैपासून गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाकरिता ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात करणार आहे. मात्र ही ऑनलाइन परवानगी घेण्यासाठी गणेशोत्सवाआधी दोन महिने या प्रक्रियेला सुरुवात केली जाते, मात्र यंदा करोनामुळे ऑनलाइन परवानगी प्रक्रियेला एक महिना उशीर झाल्याचे बोलले जात आहे.

शहरातील गणेशोत्सव मंडळांनी तात्पुरत्या स्वरूपात मंडप, ध्वनिप्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात मंडप उभारणे या परवानगीआधी ऑफलाइन केल्या जात होत्या, मात्र ऑनलाइन पद्धती सोयीस्कर पडत आहे. गणेशोत्सव मंडळांना पोलीस ना हकरत प्रमाणापत्र, अग्निशमन प्रमाणपत्र, इत्यादी परवानग्या ऑनलाइन उपलब्ध होत आहेत. दि.२५ जुलैपासून  गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणी परवानगी अर्ज करण्यास सुरुवात करण्यात येत आहे.

उत्सवाबाबत महापालिकेची मार्गदर्शिका

सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम , शिबिरे , रक्तदान शिबीर आयोजित करावे. श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करणाऱ्या व्यवस्थेवर भर द्यावा. गणेशोत्सव मंडपांमध्ये र्निजतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी.  प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ  इच्छिणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे मास्क, सॅनिटायझर वापरावर जोर द्यावा. श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ  नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून, विसर्जनस्थळी कमीतकमी वेळ थांबावे. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करून श्रींचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे.

आरोग्यदायी उत्सव साजरा करण्याचे आवाहन

या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा त्याकरिता शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमांच्या चौकटीत राहूनच गणेशोत्सव साजरा करावा असे आदेश देण्यात येत आहेत. श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती २ फुटांच्या मर्यादेत असावी.   पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर इत्यादी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेशमूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करावे. यामुळे आगमन -विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत:चे व कुटूंबीयांचे साथीच्या रोगापासून रक्षण होईल.