नवी मुंबई: कृषी उप्तन्न बाजार समिती परिसरात एका गोडाऊन मध्ये नामांकित खाद्य तेलात भेसळ करून विकणाऱ्या टोळीला नवी मुंबई गुन्हे शाखेने उध्वस्त केले. सदर ठिकाणी छापा टाकून तब्बल एक कोटी ७ लाख ५० हजार १०७ रुपयांचे भेसळयुक्त खाद्य तेल जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ११ पेक्षा अधिक लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विशाल गाला, सुशाल नागडा, निलेश राजगोर, सोहम शिंदे, दिनेश जोषी, विनोल गुप्ता, मदन हा, तसेच अन्य काही कामगार असे यातील आरोपींची नावे आहेत.कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर १९ ए भूखंड क्रमांक २० येथील गौतम ऍग्रो इंडिया नावाची कंपनी आहे. येथे खाद्यतेल पॅकिंग व प्रक्रिया व विक्री केली जाते. सदर ठिकाणी शेंगदाणा आणि मोहरीचे खाद्य तेल हे रासायन वापरून बाबत पद्धतीने बनवून विक्री केले जात अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांना मिळाली होती, या माहितीच्या आधारावर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बनकर व निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गौतम ऍग्रो कंपनीवर धाड टाकण्यात आली.
आणखी वाचा-पनवेल महापालिकेची पदभरती परीक्षा आजपासून, परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर
त्यावेळी उपस्थित कर्मचारी व कामगारांना कंपनीचे मालक कोण याबाबत माहिती नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या गोडाऊन मध्ये पंचा समक्ष कारवाई करीत सुमारे तेराशे लिटर तेलाचे ७७ बॉक्स जप्त करण्यात आले त्यात प्रत्येकी १५ ते २० लिटर तेल होते, याचे मूल्य एक कोटी ७ लाख ५० हजार १०७ रुपयांचे असल्याचे समोर आले. यात अनेक नामाकिंत कंपन्यांच्या नावाचे पॅकिंग हि आढळून आले .