नवी मुंबई शहरात १० दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येणार असून शहरात २७५ सार्वजनिक गणेश मंडळे व ३५८८४ घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.आज अनंत चतुर्थीच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात गणपती विसर्जन सोहळा पार पडणार आहे.त्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून दुसरीकडे या विसर्जन सोहळ्यावर पावसाचे सावट आहे. या सोहळ्यासाठी शहरातील अनेक ठिकाणची वाहतूक
वळवण्यात आली असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे. तर नवी मुंबई महपालिकेकडून हा सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी नैसर्गिक तलावावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. पर्यावरणशील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आठही विभाग कार्यालय क्षेत्रात नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने १३४ इतक्या मोठ्या प्रमाणावर श्रीमुर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती केलेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा