‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त देताच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तात्काळ गुरुवारी या परिसरात असलेला कचरा साफ केला आहे. नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेस राज्यात प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १५ कोटी रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, त्याच महापालिकेच्या देखण्या व आकर्षक वास्तू असलेल्या मुख्यालय परिसरात झाडांचा पालापाचोळा, झावळ्या तसेच प्लास्टिक बॅनरच्या कचऱ्याचा ढीग पडलेला असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते. याबाबत पालिका मुख्यालय परिसरातच पडलेल्या कचऱ्याच्या ढिगाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
हेही वाचा >>> पनवेल: रातोरात बांधलेला खारघरचा ‘तो’ तात्पुरता मार्ग अखेर बंद; पोलीस बंदोबस्तामध्ये रस्ता उखडला
‘लोकसत्ता’ने याबाबत वृत्त देताच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने तात्काळ गुरुवारी या परिसरात असलेला कचरा साफ केला आहे. नवी मुंबई शहरात स्वच्छतेच्या व सुशोभीकरणाच्या नवनव्या संकल्पना साकारण्यात आल्या आहेत. शहरात स्वच्छतेसाठी व रंगरंगोटीसाठी करोडो रुपयांचा खर्च केला जात आहे, परंतु पालिका मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर वाहने पार्किंग परिसराच्या बाजूलाच पालिका मुख्यालयात असलेल्या झाडांच्या फांद्या, पालापाचोळा तसेच खराब झालेले जाहिरात फलक यांचा ढीग साचल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे पालिकेच्या व पालिका मुख्यालयाच्या सौंदर्याला व स्वच्छतेला बाधा निर्माण झाली होती.
हेही वाचा >>> उरण-पनवेल रस्ता बंद झाल्याने वाहनचालकांचा धोकादायक प्रवास
पालिका स्वच्छता अधिकाऱ्यांमार्फत शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करते, त्याप्रमाणेच पालिका मुख्यालय परिसरही स्वच्छ व नीटनेटका ठेवायला हवा. नवी मुंबई शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंती, इमारती, जलवाहिन्या यांवर आकर्षक चित्रे रेखाटण्यात आली आहेत. सर्वत्र आकर्षक भित्तिचित्रे साकारली असून शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. पण ज्या पालिका मुख्यालयातून पालिकेचा कारभार सांभाळला जातो त्या इमारतीचा व इमारतीबाहेरील परिसरही स्वच्छ ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पालिका मुख्यालय परिसरात असलेला पालापाचोळा, झावळ्या तसेच कचऱ्याचा ढीग गुरुवारी पालिकेने तात्काळ उचलला आहे. पालिका मुख्यालय परिसरात असलेल्या झाडांच्याा फांद्या तसेच पालापाचोळा उचलण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी दिली.