कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसरात सध्या कचाऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे . शहरात कचऱ्याचे ढीग दिसून नयेत याकरिता शहरातील कचराकुंड्या हटवण्यात आल्या असून घंटागाडी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र आजही काही विभागात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात .
हेही वाचा >>> नवी मुंबई : प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर कोकण विभागीय आयुक्त पदी रुजू
अशाच प्रकारे कोपरखैरणे परिसरात कचऱ्याचे ढीग पहावयास मिळत आहेत. कोपरखैरणे रेल्वे परिसरात फूटपाथवर राहणारे बेघर नागरिक त्याच ठिकाणी चूल , बस्तान मांडून बसलेले आहेत. यांच्याकडून परिसरात घाणीचे साम्राज्य पसरविण्यात येतेच शिवाय, या ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कोपरखैरणे रेल्वे परिसर मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. त्यामुळे या ठिकाणी काचेच्या बॉटल्स, प्लास्टिकची ग्लास बॉटल इत्यादी कचऱ्याचे ढीग पहावयास मिळतात. त्या साचलेल्या कचऱ्यामधून दुर्गंधी पसरत आहे. वाहने पार्किंग साठी जागा असून या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर कचरा अस्ताव्यस्त झालेला आढळत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.