नवी मुंबई शहरात स्वच्छता सर्वेक्षणाचे वारे वाहत असून शहरात स्वच्छता ठेवण्यासाठी कसब लावून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत असणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये देखील भाग घेतला जात आहे. शहरातील मुख्य रस्ते,, चौक या ठिकाणी स्वच्छतेबरोबरच विविध सजावट करून रंग रांगोटी करून शहर आकर्षित करण्याकडे जोर दिला आहे. परंतु आजही शहरातील राखीव- मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर राडाराडा ,कचऱ्याचे ढीग निदर्शनास येत असून याकडे महानगरपालिकेचे मात्र सपशेल दुर्लक्ष होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- स्वच्छता कामगारांचा झाडू स्वयंस्फुर्तीने नवी मुंबईकरांच्या हाती..

शहरातील आजही बहुतांश मोकळ्या भूखंडावर कोपऱ्या कोपऱ्यात कचऱ्याबरोबरच मोठ्या प्रमाणावर राडारोड्याचा खच पडलेला आहे. शहरातील मोकळ्या भूखंडावर पडलेल्या किंवा टाकल्या जाणाऱ्या राडारोड्यावर कारवाई करण्यासाठी डेब्रिज भरारी पथक ही आहेत. मात्र शहरातील अंतर्गत रस्यावर आजही राडारोडा, कचरा पहावयास मिळत आहे. कोपरखैरणे से. ४येथील आदिवासी विकास विभागासाठी राखीव असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडारोडा टाकण्यात आलेला आहे. या ठिकाणी छोट्या छोट्या गोणीतून राडारोडा टाकल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच
स्वच्छता राखा, कचरा टाकू नये असा फलक देखील लावण्यात आलेला आहे. तरीदेखील कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : जेएनपीटी विस्थापित हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा मूळ गावठाणाचा ताबा घेण्यासाठी आंदोलन सुरू

नवी मुंबई शहरात सर्वत्र स्वच्छता राखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांच्या सहभागाने शहरात स्वच्छता करण्यात येत आहे . परंतु महानगरपालिकेकडून मोकळ्या भूखंडावरील स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील मुख्य रस्ते, चौक जरी स्वच्छ ठेवला तरी अंतर्गत मोकळ्या भूखंडावरील कचरा तसेच अंतर्गत रस्त्यावरील कचरा हे स्वच्छता सर्वेक्षणात बाधा आणण्याची शक्यता आहे. यामुळे स्वच्छता मानांकन आणि नंबर घसरण्याची शक्यता आहे. शहरातील राडाराडा उचलण्यासाठी भरारी पथके तैनात आहेत, मात्र आजही मोकळ्या भूखंडांवर राडारोड्याचा खच पडलेला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने मोकळ्या भूखंडांवरील स्वच्छतेकडे ही लक्ष देण्याची गरज आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage neglected on roads and open plots by the municipal corporation in navi mumbai dpj