नवी मुंबई : देशात गेल्या वर्षी स्वच्छतेचा तिसरा क्रमांक पटकविणाऱ्या नवी मुंबई पालिका प्रशासनाची स्वच्छता मोहिमेची लक्तरे अलीकडे वेशीवर टांगली जात आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे पदपथावर ओला सुका कचरा टाकला जात असून, साफसफाई कामगारांना तो फावड्याने गोळा करून घनकचरा वाहतूक करणाऱ्या गाडीत टाकावा लागत आहे.

केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी सुरू केलेल्या स्वछ भारत अभियानात नवी मुंबई पालिकेने पहिल्यापासून हिरीरीने भाग घेतला. स्वछता आणि सुशोभीकरण यावर पालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत, तरीही अनेक ठिकाणी स्वछतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असल्याचे दिसून येते.

Deportation of 101 criminals within Maval Vidhan Sabha Constituency Police Station limits Pune news
मावळचे वातावरण तापले! तालुक्यातून १०१ गुन्हेगार हद्दपार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
pune private hospital pollution
पुणे: खासगी रुग्णालयांवर कारवाईचा बडगा ! नियमांचे पालन न केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पाऊल
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

हेही वाचा – पनवेल : पालिका सेविकेच्या सतर्कतेमुळे बालविवाहाचे प्रकरण उघडकीस, गुन्हा दाखल

सिबीडी सेक्टर 8 येथील पालिकेच्या क्रांतिवीर फडके विद्यालयाजवळील पदपथावर दररोज ओला सुका कचरा पडलेला दिसून येत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी असलेल्या दोन कचराकुंड्या आता गायब झाल्या असून, सर्वत्र पसरलेला हा कचरा जमा करताना साफसफाई कामगारांची तारांबळ उडते. पदपथावर पसरलेल्या या कचऱ्यावर भटकी कुत्रे तुटून पडत असल्याचे दृश्य आहे. कमी अधिक प्रमाणात हे दृश्य शहरात दिसून येते आहे.