दोन वर्ष निर्बंधामध्ये दिवाळी साजरी करावी लागलेल्या नागरीकांनी यंदा निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करताना सर्व नियम गुंडाळून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळाले. मध्यरात्रीनंतरही फटाक्यांची आतषबाजी व ठणठणाट ऐकायला येत होते. सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेलेल्या दिसतात. त्यामुळे कच-याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे दिसून येते. यंदाच्या दिवाळीच्या कालावधीत वेगवेगळया प्रकारचे फटाके वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कच-यात लक्षणीय भर पडते. त्यामुळे पालिकेने शहरातील मुख्य रस्ते चौक येथील साफसफाईसाठी विशेष स्वच्छता मोहिम राबवली. परंतू मध्यरात्रीपर्यंत बेफाम उत्साहात दिवाळीचा ठणठणाट सुरु असल्याचे चित्र होते. त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी फटाक्यांच्या कचऱ्याचे ढीग पाहायला मिळाले. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी मनसोक्त दिवाळी साजरी करुन शहराचे सौंदर्य बिघडवणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा