नवी मुंबई शहर सुशोभिकरणाप्रमाणेच जास्त महत्व स्वच्छतेला असून पालिका आयुक्तांच्या आदेशाने १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनापासून कचरा वर्गीकरण नाही केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यांनी दिल्यानंतर महिनभरात कचरा वर्गीकरणात मोठा बबदल दिसून आला आहे. महिनाभरापूर्वी कचरा वर्गीकरण न करता एकत्रित जमा होणार कचरा जास्त जमा होत असे आता त्यात घट होऊन नागरीक ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन कचरा देऊ लागल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे.करोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर आता ‘रस्त्यावर शून्य कचरा ‘ नजरेसमोर ठेवून ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे पालिकेने बंधनकारक केले होते.ज्या सोसायट्या ओला सुका कचरा वेगळा करणार नाही अशा अनेक सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> चौदा गावांच्या समावेशाने नवी मुंबईकर नाराज

यामुळे महिनाभरात नागरीकांनी कचरा वर्गीकरणाला चांगला प्रतिसाद दिला आहे. तर दुसरीकडे मूळ गावठाणांकडून याबाबत सुरवातीला नाराजी व्यक्त केली जात होती परंतू गावठाणामध्येही साफसफाई कर्मचाऱ्याद्वारे वर्गीकरण केलेला कचरा संकलित केला जात आहेकरोनाच्या २ वर्षाच्या काळात करोना प्रादुर्भावामुळे आरोग्याची मोठी समस्या निर्माण होऊन निर्बंधामधून नागरीकांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते.परंतू आता संपूर्ण निर्बंधमुक्तीनंतर पालिकेने कचरा वर्गीकरणाला चांगला प्रतिसाद दिला जात आहे.कचरा निर्माण होतो त्याच ठिकाणी नागरिकांकडून ओला व सुका असा वर्गीकरण करूनच दिला जावा ज्या सोसायट्या कचरा वर्गीकरण करणार नाहीत.त्यासोसायट्यांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.ज्या सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरण होणार नाही त्या सोसायटीला प्रत्येक घराप्रमाणे २५० रुपये दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली होती.नागरिकांनी ओला व सुका असा वेगवेगळा कचरा देणे घनकचरा नियमानुसार अनिवार्य आहे.

हेही वाचा >>> उरण नगरपरिषदेने दीड टन निर्माल्यापासून खत व बायोगॅसची केली निर्मिती

कचरा वर्गीकरण न करणा-या सोसायटी, वसाहती यांचा सुरवातीला कचरा उचलला जाणार नाही असा पवित्रा घेतल्याने चांगला बदल दिसून येत आहे.
स्वच्छतेमध्ये प्रामुख्याने कच-याचे निर्मितीच्या ठिकाणीच वर्गीकरण केले जाणे व दररोज ५० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणा-या सोसायट्या, वसाहती यांनी त्यांच्या आवारातच ओल्या कच-यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.स्वछ अभियानात नवी मुंबईची कामगिरी देशपातळीवर गौरवली जात असताना नागरीकांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सुरवात केली असल्याची माहिती शहराचे मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे
यांनी दिली आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई शहरी भागात मोठ्या प्रमाणात कचरा वर्गीकरण होत असताना दुसरीकडे मूळ गाव गावठाणांच्या कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. मूळ गावठाणांमध्ये कचरा गाड्याच जाण्यास जागा नाही. त्यामुळे तेथील कचरा वर्गीकरण होणार तरी कसा असा प्रश्न निर्माण झाला होता.परंतू आता सफाई कामगारांच्या मार्फत कचरा संकलनाला सुरवात करण्यात आली आहे.

नागरीकांनी शहर स्वच्छतेबाबत व कचरा वर्गीकरणाबाबत काळजी घेणे आवश्यक आहे कचरा वर्गीकरण न करणाऱ्या सोसायट्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे १५ ऑगस्टपासून कचरा वर्गीकरण अनिवार्य करण्यात आले होते.त्याला नागरीकांना चांगला प्रतिसाद दिला असून वर्गीकरण करुन दिल्या जाणाऱ्या कचऱ्यामध्ये वाढ झाली आहे. नागरीकांनी स्वयंशिस्तीने कचरा वर्गीकरण करुन आपले आरोग्य व शहर स्वच्छ राहण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे.– अभिजीत बांगर, आयुक्त

शहरात संकलित होणारा कचरा…

ओला कचरा- १५ ऑगस्टला १५० टन , आता २६३ टन
सुका कचरा- १५ ऑगस्टला- २४८ टन , आता- ३७० टन
ओला सुका एकत्र कचरा- १५ ऑगस्टला – २८० टन , आता- २०० टन

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garbage segregation has been increased by threatening action by navi mumbai municipal corporation amy