नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा बाजारात लसणाची आवक कमी झाली असून यामध्ये उच्च प्रतीचा लसणाची आवक कमी आहे, त्यामुळे दर वाढ होत आहे. शुक्रवारी बाजारात लसूण आणखीन ५-१०रुपयांनी महागली आहे. उटी लसूण प्रतिकिलो १२०-१५० रुपये तर देशी लसूण १००-१०५ रुपयांवर विक्री होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये नवीन  लसणाची आवक होते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येत असतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी झाल्याने उत्पादन कमी होत आहे. त्यातच लसणावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने लसूण खराब निघत आहे. त्यामुळे बाजारात उच्च प्रतीचा लसूण ४०% तर हलक्या दर्जाचा लसूण ६०% येत आहे. सर्वात चांगल्या प्रतीच्या लसणाला अधिक मागणी आहे. त्यामुळे हलक्या लसणाची ही दरवाढ झाली आहे. बाजारात १० ते १२गाड्या दाखल होत आहेत.  आधी उटी लसूण प्रतिकिलो ११०-१४० रुपयांनी होता तो आता १२०-१५०रुपये  तर देशी लसूण ९५-११०रुपयांवरून १०० ते१०५रुपयांनी विक्री होत आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Garlic price hiked by rs 5 to 10 rs 150 per kg in wholesale market ysh
Show comments