लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उरण : नगरपरिषदेच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या सोयीसाठी व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शहरातील बोरी स्मशानभूमीत गॅसवर आधारित शवदहिनीचे काम पूर्ण झाले असून येत्या महिन्याभरात शवदाहिनी सुरू होणार असल्याची माहिती उरण नगर परिषदेने दिली आहे. यासाठी लागणार गॅसपुरवठा करणाऱ्या गॅस वाहिनीचे काम आठवडाभरात पूर्ण होणार असल्याची माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली आहे.

उरण नगरपरिषदेच्या या सुविधेमुळे नागरिकांनाही फायदा होणार आहे. उरणमध्ये बोरी येथे स्मशानभूमी असून लाकडाचा वापर करून दहन केले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका न पोहचवता दहन करण्यासाठी सुवर्ण महोत्सव नगर उत्थान कार्यक्रमाअंतर्गत ९५ लाखांच्या निधीमधून हा प्रकल्प राबविला जात आहे.

आणखी वाचा-स्मशानभूमीसाठी पर्यावरणपूरक ‘ब्रिकेट’, नवी मुंबई महापालिकेचा प्रायोगिक तत्वावर वापर

उरण शहरातील बोरी येथील स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रासली आहे. येथील सरणाची दुरवस्था झाली आहे. उरण नगर परिषदेच्या सर्वात मोठ्या या स्मशानभूमीत नव्याने गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. यामुळे दहनासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे होणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या नव्या गॅस वाहिनीमुळे धूररहित अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे लाकडांची बचत होऊन निसर्गाचेही संरक्षण होणार आहे. मात्र ही सुविधा मोफत की शुल्क आकारण्यात येईल याचा निर्णय नगर परिषद घेणार आहे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gas supply of uran nagar parishad will start within a month mrj