स्वादिष्ट, लुसलुशीत डोनट्स बनवण्याची कला आता तुम्हाला सहज शिकता येईल. आपल्या आवडत्या व्यक्तीला स्वतःच्या हाताने बनवलेले चविष्ट डोनट्स खाऊ घालण्याची नामी संधी हवी असेल तर सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलला आज जरूर भेट द्या . या मॉलने महिलांसाठी खास सुरु केलेल्या ‘विमेन्स ऊहू वेनेसडेज’ (‘Women’s Woohoo Wednesdays’) मध्ये हॅन्डक्राफ़्टेड डोनट्स वर्कशॉपचे आयोजन करण्यात आळे आहे.

मॅड ओव्हर डोनट्सच्या सहकार्याने आज १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते रात्री ८ या दरम्यान चारवेळा हे वर्कशॉप घेतले जाईल. त्यामुळे नोकरी न करणाऱ्या तसेच नोकरी करणाऱ्या स्त्रियादेखील आपापल्या वेळेनुसार या संधीचा लाभ घेऊ शकतील. यासाठीची नावनोंदणी मॉलमध्ये जाऊन करता येईल. सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉलने हा संपूर्ण महिनाभर ‘सेलिब्रेशन ऑफ लव्ह’ हा उपक्रम चालवला असून हे वर्कशॉप त्याचा एक भाग आहे.

‘विमेन्स ऊहू वेन्सडेज’ मध्ये स्त्रियांसाठी कितीतरी वेगवेगळ्या फ्री ऑफर्स ठेवण्यात आल्या आहेत. मेकओव्हर बाय लॅक्मे, लॉरिअल, मेबीलाईन अँड कोलोरेसेन्स; टीप अँड टो नेल्सतर्फे नेल आर्ट, एन्वी सलोनतर्फे केशरचना अशा विविध फ्री ऑफर्सचा लाभ यानिमित्ताने घेता येईल. याशिवाय एन्वी सलोन, ओल्ड बेलीज, ग्लोबस, स्मॅश, पिझ्झा हट, ऑरगॅनिक हार्वेस्ट, बिग बझार, जेन नेक्स्ट व मॅड ओव्हर डोनट्स यासारख्या लोकप्रिय ब्रॅंड्सवर आकर्षक सूटदेखील मिळेल. मॉलमध्ये त्यांच्यासाठी मोफत पार्किंग सुविधादेखील आहे.

 

Story img Loader