ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या अर्ज भरण्याच्या शुक्रवारच्या शेवटच्या दिवशी घारापुरी ग्रामपंचायतीत ठाकरे गट शिवसेना व्यतिरिक्त एकाही पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्याची छाननी नंतर केवळ विजयाची घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिल्याने उमेदवारांनी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच आनंद व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- एपीएमसी सभापतीसाठी रस्सीखेच सुरू; शिंदे गटाचे प्रभु पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता

सत्ताधारी ठाकरे गटाच्या शिवाय निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विरोधकाकडे एकही उमेदवार सापडला नसल्याने अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सरपंचपदासह आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उरण तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घारापुरी ग्रामपंचायतीवर ठाकरे सेनेचा भगवा निविर्वाद, बिनविरोध फडकल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यापासूनच घारापुरी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी भाजप समर्थकांनी केली होती.निवडूकीच्या पार्श्वभूमीवर पुस्तिकाही प्रसिद्ध केली होती.उमेदवारांची चाचपणीही करुन निवडणुकीत उतरण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र कोरोनाची दोन वर्षं वगळता तीन वर्षात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या गावाच्या विकासकामांमुळे सेना उमेदवारांपुढे निभाव लागणार नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजपने धरुन बांधून तयार केलेल्या पैकी एकही उमेदवार शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुढे आला नाही.

हेही वाचा- नवी मुंबई: ‘त्या’ वादग्रस्त आश्रम चर्चवर अतिक्रमण कारवाई; चर्चच्या फादरवर बाल लैंगिक शोषण प्रकरणी झाली होती कारवाई

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात भाजप गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे घारापुरी ग्रामपंचायतीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आठही उमेदवार बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होण्याची औपचारिकताच उरली आहे.दरम्यान आठही सदस्यांनी जिल्हा प्रमुख मनोहर भोईर यांची भेट घेऊन जल्लोष केला.

हेही वाचा- उरण मध्ये गोवरचा संशयित रुग्ण

ग्रामपंचायत घारापुरी सार्वत्रिक निवडणूक २०२२

थेट सरपंच उमेदवार महिला आरक्षण.
१)सौ.मीना मुकेश भोईर.
प्रभाग क्रमांक १
१)श्री.बळीराम पद्माकर ठाकुर..ना.म.प्र.राखीव पुरुष.
२)सौ.हेमाली रुपेश म्हात्रे.सर्वसाधारण महिला
३) सौ.अरुणा कमलाकर घरत.सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २
१)श्री.भरत शंकर पाटील.सर्वसाधारण
२) सौ.नीता दिनेश ठाकुर.सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
१)श्री.सचिन मुकुंद लाड.सर्वसाधारण
२)सौ.भारती प्रमोद पांचाळ.सर्वसाधारण
या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gharapuri gram panchayat elecation is likely to be unopposed navi mumbai dpj