नवी मुंबई : सुधारगृहात रवानगी केलेल्या एका मुलीने तेथून पलायन केले होते. सदर मुलगी घणसोली येथील चिंचआळीत आढळून आल्यावर तिला काही लोकांनी ओळखले. ही बाब काही स्थानिक पुढाऱ्यांला कळल्यावर त्यांनी सदर मुलीस रबाळे पोलिसांच्या ताब्यात दिले.घणसोली येथील चिंचआळीत एका अल्पवयीन मुलीचे अन्य काहींशी वाद सुरू होते. त्यामुळे अनेकांचे तिच्या कडे लक्ष गेले. त्यावेळी गर्दीतील काही जणांनी मुलीस ओळखले आणि वाद घालणारी मुलगीस बाल सुधारगृहात टाकण्यात आले होते. ती यावेळी कशी बाहेर आली अशी शंका उपस्थित झाल्याने त्यांनी ही बाब एका स्थानिक पुढाऱ्याच्या कानावर घातली.
सदर मुलीस गोड बोलून थांबवून ठेवले गेले . दरम्यान या बाबत रबाळे पोलिसांना कळवल्याने तेही घटनास्थळी दाखल झाले व तिला ताब्यात घेतले. बाल सुधारगृहातुन पळून आलेली मुलगी हीच का याची खात्री पोलिसांनी केली. त्यामुळे आता पुन्हा तिची रवानगी बाल सुधार गृहात केली गेली आहे . अशी माहिती रबाळे पोलिसांनी दिली. तिच्या विरोधात काय गुन्हे होते, वा कुठल्या कारणाने तिला बाल सुधारगृहात टाकण्यात आले आदी तपशील देण्यास पोलिसांनी नकार दिला.