पनवेल शहर व सिडकोच्या इतर वसाहतींमध्ये सोनसाखळी चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असताना कळंबोली वसाहतीचा परिसर महिलांसाठी सुरक्षित असल्याचे दिसत आहे. मागील वर्षभरात या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मंगळसूत्र चोरीची केवळ घटना घडली असून पोलिसांनी त्याचाही छडा लावला आहे. या पाश्र्वभूमीवर कळंबोली पोलिसांचे सोमवारी त्यांच्या पोलीस ठाण्यात कौतुक करण्यात आले.
कळंबोली पोलीस ठाण्याचा स्वतंत्र कारभार २०१३ मध्ये सुरू झाला. त्यामुळे दोन लाख लोकवस्ती आणि स्टीलबाजाराचा व्यापारी परिसर या कार्यक्षेत्रावर नियंत्रणाची जबाबदारी ११० पोलिसांच्या खांद्यावर येऊन पडली. कळंबोली पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये ९ सोनसाखळी चोऱ्या झाल्या त्यापैकी ५ चोरटय़ांपर्यंत पोलीस पोहोचले. २०१४ हा आकडा एकवर स्थिरावला आणि २०१५ नोव्हेंबपर्यंत त्यात वाढ झाली नाही. या दोनही गुन्ह्य़ांतील सोनेसंबंधित महिलांना पोलिसांनी मिळवून दिले. यानिमित्त द. ग. तटकरे विद्यालयाचे अध्यक्ष व शिक्षिकांनी पोलिसांचा कौतुक सोहळा आयोजित केला. मंगळसूत्र चोरीला कळंबोलीतून हद्दपार केल्याने सोमवारी कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोहिते यांच्यासह त्यांच्या पथकाला गौरविण्यात आले. मुख्य रस्त्यावरील शहरातील तीन ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरा व तपासणी नाक्यावरील २४ तास तैनात असलेल्या पोलीस बळामुळे हे शक्य झाल्याचे पोलीस अधिकारी मोहिते यांनी शिक्षिकांना सांगितले. कौटुंबिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी महिलांनी ९८२२६३२३८२ या माझ्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मोहिते यांनी या वेळी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Glory of police in kalamboli
Show comments